मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून मजुरांना मिळणार रोजगार, खासदार प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने १०३ पांदन कामांना मंजुरी

949 Views

 

गोंदिया : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासा सह दरडोई उत्पादनातून प्रत्येक नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा या दृष्टीकोनातून खासदार श्री प्रफुल पटेल प्रयत्नशील आहेत, या अनुषंगाने जिल्हयातील नागरी भागासह ग्रामीण क्षेत्राच्या विकासात भर पडावी या साठी जास्तीत जास्त कामे खेचून आणले जात आहे. जिल्हातील मजुरांना जिल्ह्यातच काम मिळावे या उद्देशाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत प्रस्तावित पांदन रस्त्यासाठी खासदार प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा केला. या अनुरूप राज्य शासनाच्या नियोजन विभागाने मातोश्री ग्राम समृद्धी योजने अंतर्गत २०२२ – २०२३ या वर्षाचा आराखड्यातील १०३ पांदण रस्त्याच्या कामांना मान्यता प्रदान केली आहे, यामुळे गोंदिया जिल्ह्यातील मजुराना कामे मिळणार आहे. मनरेगा अंतर्गत मान्यता प्राप्त कामामुळे विकास कामांना गती मिळणार आहे.
गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबंध आहोत अशी ग्वाही देतात, त्यानुरूप विकासाला गती देण्याचे कामे केले जात आहेत. मागील अनेक दिवसापासून प्रलंबित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारती साठी निधी आणून बांधकामाला प्रशासकीय मान्यता, पर्यटन विकासांतर्गत विविध तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राच्या कामांना मंजुरी प्राप्त करून देण्यात खासदार प्रफुल पटेल यांचा सिहाचा वाट राहील या विकास कामांसह दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी व प्रत्येक नागरी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा या दृष्टीकोनातून मजुरांच्या हाताला जिल्ह्यातच काम मिलावे यासाठी पटेल यांनी प्रस्तावित पांदण रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाच्या नियोजन व रोजगार हमी योजना विभागाशी पाठपुरावा केला. दरम्यान नियोजन विभागाने २९ मार्च २०२२ रोजी मातोश्री ग्राम समृद्धी पांदण रस्त्यातर्गत जिल्ह्यातील १०३ पांदण रस्त्यांच्या कामांना मान्यता प्रदान केली आहे हि कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत करण्यात येणार आहे. मान्यता प्राप्त पांदण रस्त्याच्या माध्यमातून प्रति १ किमी या प्रमाणे १०३ किलोमीटर चे बांधकाम करण्यात येणार आहे.या पांदण रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीची साधने ने – यान करण्याकरिता सोयीस्कर होणार आहे. तसेच या माध्यमातून जिल्ह्यातील लाखो मजुरांना काम मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पांदण रस्त्यांची कामे

खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील प्रस्तावित १०३ पांदण रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या नियोजन विभागाने मातोश्री ग्राम समृद्धी पांदण रस्ते योजने अंतर्गत मान्यता प्रदान केली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४६ पांदण रस्ते तिरोडा तालुक्यातील १०, गोरेगाव तालुक्यातील १२, आमगाव तालुक्यातील १०, सडक अर्जुनी तालुक्यातील १२, सालेकसा १, देवरी ०३ व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ०९ पांदण रस्त्यांचा समावेश आहे.

Related posts