गोंदिया: जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सायकल चालवत दिला पर्यावरण वाचवा, आरोग्य वाचवा संदेश…

905 Views

 

गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने घेण्यात आला उपक्रम.. 

गोंदिया :- महिला दिनाचे अवचित्त साधून गोंदियातिल सायकल संडे ग्रुपच्या वतीने आज खास महिलांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेऊन सायकल चालविण्याचा आनंद घेत पर्यावरण वाचवा, आरोग्य वाचवाचा संदेश दिला. या अभिनव उपक्रमामध्ये गोंदिया शहरातील शेकडो महिला व तरुणींनी मोठ्या संख्येत भाग घेतला.

अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, गांगझरी पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक तेजसवणी कदम, सायकलिंग संडे ग्रुप च्या अध्यक्ष मंजु कटरे, सचिव रवी सपाटे, सायकलिस्ट मुन्नालाल यादव, पुरुषोत्तम मोदी, पूजा तिवारी उपस्थित होते. कार्यक्रम संचालन ममता येदे त्याच प्रमाणे आभार प्रदर्शन त्रिवेणी डोहरे यांनी केले.

महिलांनी दिवसातून एक तास तरी आपल्यासाठी काढवा तसेच सायकलिंग, वॉकिंग, स्विमिंग, या कोणता तरी स्पोर्ट्स मध्ये खेळावे असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना दिला. सायकलिंग संडे ग्रुप मध्ये गोंदिया येथील महिला सामजिक कार्यकर्त्या भावना कदम, दिव्या भगत, सविता बेदरकार, डॉ. सूर्णा हुबेकर, संगीता असाटी, शुभा भरत्वाज तसेच गोंदिया येथील आर्वेदिक कॉलेज मध्ये महिला शिक्षिका व विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला होता.

गोंदिया शहरातिल सायकल संडे या ग्रुपच्या वतीने “एक दिन सायकल के नाम” हा उपक्रम मागील २०७ आठवड्या पासून सुरू असुन या उपक्रमाअंतर्गत दर आठवड्यात रविवारच्या दिवशी शहरातील तरुण तरुणी, वयोवृद्ध त्याचप्रमाणे लहान मूल देखील या उपक्रमात सहभाग घेऊन सायकल चालविण्याचा आनंद घेत असतात.

हा ग्रुप पर्यावरणाचा समतोल आणि मानवी जीवन सुदृढ करण्यासाठी जवळपास २० ते २५ किलोमीटर सायकल चालवून सामाजिक संदेश देत असतो. या उपक्रमाची चर्चा आज गोंदियाच नाही तर विदेशात देखील रंगू लागली आहे. हळू हळू का होईना राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तरुणाई आपल्या ठिकाणी हा उपक्रम राबवित असून मानवी जीवन सुदृढ करण्याचा संदेश देत आहेत.

विशेष बाब म्हणजे गोंदियातील सायकल संडे गुप मध्ये १० वर्षाच्या तरुणांना पासून तर ८० वर्षांचा वृद्ध व्यक्तीचा देखील सहभाग आहे. गोंदियातील सायकल पटू मुनालाल यादव यांचा ८० वा वाढदिवस देखील या निमित्ताने आज सायकल संडेच्या वतीने साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त जिल्ह्याधिकारी यांच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सायकलिस्ट मध्ये विजय येडे, शिवम पटले, पियुष हेरोडे, राकेश पेंढारकर, अजितकुमार शेनमारे, नरेंद्र बेलगे, दीपाली वाढई, भारती लाडे, आशिष पटले, निखील बहेकार, भुमि वेगड, कल्याणी गाडेकर, दीपक गाडेकर, निलेश खवाले, जितेंद्र खरवाडे, हितेंद्र खरवडे, गुरूजॊत् गहिर, करिश्मा भोजवानी, भूमि खटवानी, वैशाली भंडारकर, शारदा बनोटे, अथर्व चौधरी, स्वाति जैन, त्रिवेणी ढोरे, आर्यन कुम्भलवार, सरोज कटरे, अश्विनी खरवडे, हर्षा खटवानी, शालिनी आग्रे, रोशनी, भूमी, गोपाल शर्मा, इत्यादीचा सहभाग होता.

Related posts