उपविभागीय अधिकारी मार्फत महामहिम मा. राष्ट्रपती महोदयांना निवेदन
गोंदिया। काल २३ फेब्रुवारी ला महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. नवाब मलीक यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) ने मुंबई येथे बेकायदेशीर रित्या अटक केली. काही दिवसांपूर्वी ना.नवाब मलिक यांनी भाजपा नेत्यांच्या भष्टाचारा विरोधात आवाज बुलंद केला होता या बदलेच्या व सुडबुद्धीतून केंद्र सरकार ने बेकायदेशीर ईडी ची कारवाई करीत श्री मलिक यांच्यावर अटक करण्यात आली.
या घटनेच्या निषेधार्थ आज 24 फेब्रुवरी ला राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष गोंदिया च्या वतीने ईडी व्दारे सुडबुद्धी ने केलेल्या कारवाईचा निषेध करीत उपविभागीय अधिकारी, गोंदिया मार्फत महामहिम मा. राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या सरकारी यंत्रणांच्या दुरूपयोगा विरूद्ध घोषणाबाजी व निषेध केला.
या वेळी मोर्चात माजी आमदार राजेंद्र जैन, बाळकृष्ण पटले, अशोक सहारे, केतन तुरकर, विशाल शेंडे, मनोहर वालदे, मनोज डोगरे, विनीत सहारे, सुनील भालेराव, सौ. आशाताई पाटील, श्रीमती सुशीलाताई भालेराव, सौ. कुंदाताई दोनोडे, सौ. रजनीताई गौतम, रफिक खान, डी. यू. रहांगडाले, अखिलेश सेठ, शंकर टेंभरे, रवी पटले, शोभाताई गणवीर, खालिद पठाण, गोविंद लिचडे, प्रतीक भालेराव, सुनील पटले, शैलेश वासनिक, कृष्णा भांडारकर, एकनाथ वहिले, विक्की बाकरे, आरजू मेश्राम, दीपक कनोजे, रामेश्वर चौरागडे, रमेश होतचंदानी, दिलीप पाटील, डॉ सुरेश कावडे, दिलीप डोंगरे, करण टेकाम, योगेश दर्वे, सौरभ गौतम, नागो सरकार, दर्पण वानखेडे, डुमन धुर्वे, नागरत्न बन्सोड, श्याम चौरे, राजेश नागपुरे, सौ. पुस्तकाला माने, पवन धावडे, यशवंत सोनवणे, प्रदीप लांजेवार, लीकेश चिखलोंडे, राज शुक्ला, सौरभ गौतम, विक्रांत तुरकर, लक्ष्मीकांत चिखलोंडे, अमित आसवानी, विजय बिसेन, आत्माराम पटले, रुपलाल चिखलोंडे, आकाश नागपुरे, चेतन कुंभारे, माणिक पडवार, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, जयेश जांभुळकर, प्रवीण बिसेन, मदन चिखलोंडे, कनक दोनोडे, हर्षीत चंदेल, रामू चुटे, योफी येडे, गोविंद लिचडे, दीपक रिणयात, शुभम बोदेले, प्रमोद कोसरकर, नासिर घाणीवाला, निरज उपवंशी, सय्यद इकबाल, शिवलाल नेवारे, वामन गेडाम, धर्मराज कटरे, अशफाक तिगाला, तिलकचंद पटले, विजय रहांगडाले, पिंटू बनकर, बबलू ढोमणे व फार मोठ्या संख्येने शहर, तालुका राष्ट्रवादी कांग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकारी उपस्थित होते.