गोंदिया: वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची गांधीगिरी, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या वाळू घाटावर रात्रभर फ्लॅग मार्च

715 Views

 

वाळू चोरीला आळा घालण्यासाठी महसूल विभागची अनोखी शक्कल…

गोंदिया दि.4 – जिल्ह्यात गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गांधीगिरी करत रात्रभर गोंदिया तालुक्यातील किन्ही वाळू घाटावर पहारेदारी करुण गस्त लावली. यामुळे वाळू तस्करी करणाऱ्या टोळींचे धाबे दणाणले आहेत. गोंदियाचे जिल्हाधिकारी नयना गुंडे ह्या रेती चोरी या विषयावर ॲक्शन मोडवर आहेत. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या सह संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांनी वाळू घाटावर रात्रभर फ्लॅग मार्च करून वाळू तस्करी करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचा संदेश दिला आहे.

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनात अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रयोग केला आहे की, ते स्वतः आणि महसूल विभागातील मंडळाधिकारी, तलाठी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या सोबत वाळू घाटावर जाऊन रात्रभर मुक्कामी थांबले. यावेळेस जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख व सहा जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, किशोर राठोड, राजकुमार भाजीपाले, राजेश बोडके, गिरधारी सोनवाने, दिवाकर शेट्टे, प्रमुख्याने उपस्थित होते.

वाळू चोरी थांबविण्यासाठी जिल्ह्याभरात महसूल विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. सदर पथकाद्वारे जिल्ह्यातील वाळू घाटांवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. वाळू चोरीचे प्रकरण विशेषतः रात्रीच्या वेळेस घडत असल्यामुळे वाळू चोरट्यांना पकडण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात आले. वाळू घाटावर रात्रभर महसूल कर्मचारी यांनी ठिय्या देऊन वाळू चोरी थांबविण्यासाठी हातभर लावला. सदर मोहिमेअंतर्गत रेती चोरी पकडण्याऐवजी वाळूच चोरीला जाणार नाही, अश्या प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी वेगळी शक्कल लढवीली जात आहे.

जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा उपक्रम राबविण्यात आला की, रेती घाटावर जाऊन महसूल प्रशासनाने ठिया देऊन वाळू तस्करी करणाऱ्यांना कडक संदेश दिला आहे. सदर उपक्रमाची रचना अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी तयार केली असून जिल्ह्यातील सर्व रेती घाटांवर याप्रकारे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्रभर मुक्कामी राहतील. कधी वाळू तस्करी होणाऱ्या मुख्य मार्गांवर पथकाद्वारे कारवाई करतील, तर कधी रेती साठा जप्तीची मोहीम राबवतीलत अशी माहिती अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली आहे.

Related posts