गोंदिया: आता तालुका हद्दीतील कोणत्याही गावातील शेतकरी आपल्या इच्छेनुसार केंद्रावर धानविक्री करू शकतो, खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव अन्न व नागरी पुरवठा विभागाचा निर्णय

516 Views

 

गोंदिया : आधारभूत किंमतीमध्ये धानखरेदी करण्याकरीता शासकीय केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, मंजूर केंद्रामध्ये परिसरातील गावे जोडण्यात आले होते. यामुळे शेतकर्‍यांची हेळसांड होत होती. ही बाब जनप्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत पोहोचविण्यात आली. शेतकर्‍यांचे हिताच्या अनुसंगाने खा.प्रफुल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाशी पाठपुरावा केला. यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने २२ नोव्हेंबर रोजी शुध्दीपत्रक निर्गमित करून तालुका हद्दीतील कोणत्याही गावातील शेतकरी आपल्या इच्छेनुसार केंद्रावर धानविक्री करू शकतो, अशी मुभा दिली आहे. तशा सुचनाही शुध्दीपत्रकाच्या माध्यमातून यंत्रणेला देण्यात आले आहे.

मार्वेâटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सींच्या माध्यमातून आधारभूत किंमतीमध्ये धानखरेदी केली जाते. यासाठी अनुक्रमे १०४ व ४४ असे एकूण १४८ धानखरेदी केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे. मंजूर केंद्रांना धानखरेदीसाठी गावांचे क्षेत्र व गावनिहाय शेतकर्‍यांची यादी तलाठ्यांकडून प्राप्त करून त्यांची नोंद घ्यावी, अशा सुचना केल्या होत्या. यामुळे ठराविक केंद्रामध्येच त्या-त्या गावातील शेतकर्‍यांना धानविक्री करणे बंधनकारक होते. परिणामी शेतकर्‍यांना गावशेजारच्या केंद्राला सोडून १० ते १५ किमीचे अंतर कापून त्या केंद्रावर धानविक्री करावी लागत होती. त्यातच एकाच केंद्रावर होत असलेल्या गर्दीमुळे शेतकर्‍यांची फसगतही व्हायची. या समस्येला घेवून शेतकरी अडचणीत यायचे ही बाब खा.प्रफुल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शेतकर्‍यांचे हितसंबध जोपासून ना.भुजबळ यांना तालुक्यातील कोणत्याही केंद्रावर धानविक्री करण्याची मुभा देण्यासंदर्भात आग्रह केला. यानुरूप अन्न व नागरी पुुरवठा विभागाने २२ नोव्हेंबर रोजी शुध्दीपत्रक निर्गमित करून तालुका हद्दीमध्ये कोणत्याही गावातील शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही केंद्रामध्ये धानविक्री करू शकतो. त्यानुसार धानखरेदी केंद्रावर धानविक्रीसाठी नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांची गावनिहाय नोंद खरेदी केंद्रावरील रजिस्टरवर करावी, सदर रजिस्टर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना खरेदी केंद्र तपासणीच्या वेळी उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना शुध्दीपत्रकाच्या माध्यमातून केल्या आहेत. यामुळे शेतकर्‍यांना आता तालुक्यातील कोणत्याही केंद्रावर धानविक्री करता येणार आहे. उल्लेखनिय असे की, खा.प्रफुल पटेल हे सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहतात. हे या निर्गमित शुध्दीपत्रकावरून स्पष्ट झाले आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेतल्यामुळे शेतकर्‍यांनी खा.प्रफुल पटेल यांचे अभिनंदन केले.

Related posts