गोंदिया कोरोना अपडेट: १६१ रुग्ण औषधोपचारातून बरे…नव्या ७३ बाधित रुग्णांची नोंद, 2 मृत

834 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। जिल्ह्यातील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार आज १६१ रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केली. तर नविन ७३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यात आज ७३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे. गोंदिया तालुका-४८, तिरोडा तालुका-७, गोरेगाव तालुका-१, आमगाव तालुका-१, सालेकसा तालुका-१०, देवरी तालुका-२, सडक/अर्जुनी तालुका-१ व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-४२५३, तिरोडा तालुका-९८८, गोरेगाव तालुका-३१६, आमगाव तालुका- ४५६, सालेकसा तालुका-३४७, देवरी तालुका-२७५, सडक/अर्जुनी तालुका-२४५, अर्जुनी/मोरगाव तालुका-२८२ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-८९ रुग्ण आहे. असे एकूण ७२५१ रुग्ण बाधित आढळले आहे.

आज ज्या १६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका-१०१, तिरोडा तालुका-१४, गोरेगाव तालुका-८, आमगाव तालुका-९, सालेकसा तालुका-६, देवरी तालुका-४, सडक/अर्जुनी तालुका-७, अर्जुनी/मोरगाव तालुका-०० व इतर राज्य/जिल्ह्यातील १२ रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत ५३१३ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-३२४२, तिरोडा तालुका-६८९, गोरेगाव तालुका-२१८, आमगाव तालुका-३२१, सालेकसा तालुका-१६२, देवरी तालुका-१७६, सडक/अर्जुनी तालुका-१९४, अर्जुनी/मोरगाव तालुका-२३१ आणि इतर-८० रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या १८३६ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-९५१, तिरोडा तालुका-२८४, गोरेगाव तालुका-९५, आमगाव तालुका-१२९, सालेकसा तालुका-१८३, देवरी तालुका-९७, सडक/अर्जुनी तालुका- ४८, अर्जुनी/मोरगाव तालुका-४९ आणि इतर-०० असे एकूण १८३६ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

क्रियाशील रुग्णांपैकी ६१८ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-२७४, तिरोडा तालुका-८१, गोरेगाव तालुका-४६, आमगाव तालुका-४०, सालेकसा तालुका-८०, देवरी तालुका-५६, सडक/अर्जुनी तालुका-००, अर्जुनी/मोरगाव तालुका-४१ व इतर ०० असे एकूण ६१८ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.

आतापर्यंत १०२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-६०, तिरोडा तालुका-१५, गोरेगाव तालुका-३, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-२, देवरी तालुका-२, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-२ व इतर ठिकाणच्या नऊ रुग्णांचा समावेश आहे.

ज्या दोन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ४७ वर्षीय रुग्ण राहणार तिरोडा यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ७६ वर्षीय रुग्ण राहणार अर्जुनी/मोरगाव यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ३०५७४ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २३९०१ नमुने निगेटिव्ह आले. तर ४६६६ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १९४ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून १८१३ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात ३ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात २८८ व्यक्ती अशा एकूण २९१ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २७१८५ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये २४५९८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. २५८७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १०४ चमू आणि ९७ सुपरवायझर, ९७ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-७, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-४, देवरी तालुका-२२, सडक/अर्जुनी तालुका-७, गोरेगाव तालुका-२०, तिरोडा तालुका-२५ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-६ असे एकूण ९७ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.

रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोविड-१९ चा अहवाल एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येत आहे. सदरहू अहवाल ग्राह्य धरण्यात यावा.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ३ ऑक्टोबर रोजी आयोजित नावीन्यपूर्ण उपक्रम असलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000

Related posts