केंद्र सरकार दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ करुण कोवीडमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेची पिळवणूक करीत आहे- मा. आ. राजेंद्र जैन

238 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया।  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषद क्षेत्र ठाणेगावची पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संजय चुटे यांचे निवासस्थान समोरील प्रांगण, चिखली येथे पार पडली.

याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन संबोधनात म्हणाले कि, आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही, हे जनतेला पटवून द्यावे. धापेवाडा सिंचनासाठीचे क्षेत्र वाढवण्या साठी व शेतकर्‍यांच्या आर्थिक समृद्धी करीता टप्पा २ चे कामे लवकरात लवकर पुर्ण करु व धापेवाडा टप्पा ३ चे नियोजन करण्याचे निर्देश खासदार श्री प्रफुल पटेल यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत.

केंद्र सरकार दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेल व स्वयंपाकाचा गँस व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून कोवीडमुळे बेरोजगार व आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेची पिळवणूक करीत आहे. या वाढत्या महागाईला जबाबदार असणाऱ्या भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे. सात वर्षांपूर्वी खोटी आश्वासने देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला भुलविण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपाला आता इथली तरुणाई पुन्हा भुलणार नाही.जनता जागृत झाली आहे.

श्री विजय शिवनकर संबोधित करतांना म्हणाले की, जिल्हा परिषद क्षेत्र निहाय बूथ कमिटीचे सशक्तीकरण व कार्यकर्ताशी समन्वय साधून आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष वाढीवर भर देण्यात यावा. या सोबतच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, योगेंद्र भगत, रविकांत बोपचे, कैलास पटले, मनोज डोंगरे, निताताई रहांगडाले, जयाताई धावडे, डा.संदीप मेश्राम, योगेंद्र टि कटरे, शिशुपाल पटले, राजू ठाकरे, किरण बन्सोड, नितेश खोब्रागडे, किशोर पारधी, संंजय रावल, रविद्र तिडके, संजय चुटे, यश रहांगडाले, के एस पटले, तेजराम पटले, सविता पटले, सिमा कटरे, राजेंद्र पटले, पल्लवी भोयर, संजय पटले, दिलीप बघेले, अजय बारापात्रे, राघोर्ते सर, भवानी बैस, भुमेश्वर पारधी, प्रदिप कायदे, आशु पटले, सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts