गोंदिया( ता.25) राखीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी भुजली विसर्जन ही लोधी समाजातील महिलांची जुनी परंपरा आहे. या निमित्त भुजली विसर्जनाचा कार्यक्रम तालुक्यातील इर्री येथील महिलांनी सोमवारी(ता.24) आनंदात साजरा केला.
लोधी समाजात रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी भूजली विसर्जन ही एक जुनी परंपरा आहे. यात पवित्र असलेल्या बहिण भावाच्या प्रेमाची आख्यायिका सुद्धा जोडण्यात येत असते. बहिण भावाच्या पवित्र प्रेमाची आठवण म्हणून लोधी समाजात बुजली विसर्जनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. या समाजातील महिला रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. हीच परंपरा अबाधित राखून येथील महिलांनी आनंदउत्सव साजरा केला. यात यावर्षी विविध रंगारंग कार्यक्रमांचा सहभाग देखील करण्यात आला.
यावेळी भुजली विसर्जनाची गावातून मिरवणूक काढून ती गावातील तलावाच्या काठावर विसर्जन करण्यात आले. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरिता बिरनवार, जैतुरा दमाहे, धर्मशिला उपवंशी, दुर्गाबाई ठकरेले, अजवंती उपवंशी, गिताबाई नागपुरे, प्रमिला उपवंशी, दुर्गाबाई कमल ठकरेले, कुमारीबाई लिल्हारे, छोटीबाई बनोटे, मुन्नीबाई ठकरेले,भागनबाई ठकरेले, प्रांताबाई ढेकवार,श्यामाबाई दमाहे,उर्मिलाबाई उपवंशी, भोजवंताबाई ठकरेले,रमुलाबाई उपवंशी, यांनी सहकार्य केले.