गोंदिया: अंभोरा व बरबसपुरा येथे श्री पद्धतीने भात लागवड, कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम

749 Views

 

गोंदिया. ता.5   श्री पद्धतीतीने धान लागवड ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून या पद्धतीत कमी खर्चात व कमी पाणी वापरात भरघोस पीक उत्पादन होत असते. हीच बाब हेरून गोंदिया तालुक्यातील बरबसपुरा व आंभोरा येथील अनेक शेतकऱ्यानी यावर्षी श्री व पट्टा पद्धतीने धानाची लागवड केली आहे.

आंभोरा येथील सरपंच चिंतामण चौधरी, नरेंद्र गणवीर, शैलेश चंद्रिकापुरे, परमानंद गणवीर, यादोराव रहांगडाले,योगलाल कटरे, प्यारेलाल चौधरी, यांनी तर  बरबसपुरा येथील उपसरपंच मनोज नागपुरे, नरेंद्र दमाहे, यांनी तसेच इतर शेतकऱ्यांनी यावर्षी श्री व पट्टा पद्धतीने भात पिकाची लागवड केली आहे.

श्री व पट्टा पद्धतीने धान लागवड केल्यामुळे रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश व मोकळी हवा मिळतो. यात बियाण्यांचे प्रमाण कमी लागत असून कमी दिवसाच्या रोपाला फूटाळ्यांच्या संकेत वाढ होत असते.त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होतो. या पद्धतीत युरिया ब्रिकेटस चा वापर होत असल्याने सहाजिकच रासायनिक खतांचा खर्च कमी येतो. त्यामुळे लागवड खर्च कमी येत असून शेतकऱ्यांची आर्थिक बचत होत असतो.

या पद्धतीत  धान रोपांची लागवड दूर दूर होत असल्याने रोगांचे प्रमाण अत्यल्प दिसून येतो.  या पद्धतीने भात पिकांची लागवड केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा दिसून येतो.

त्यामुळे यावर्षी या भागातील अनेक शेतकऱ्यांनी श्री व पट्टा  पद्धतीने धान रोपांची लागवड केली आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पद्धतीने धान लागवड करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी  तुंमडाम यांच्या मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी कल्लेवार,कृषी पर्यवेक्षक टेंभुर्णी, कृषी सहाय्यक नूतन भालाधरे अधिक परिश्रम घेत आहेत.

Related posts