भंडारा: दहेगाव खान सुरु होईपर्यंत हा लढा सुरू राहणार – माजी आ.राजेंद्र जैन

291 Views

 

बारव्हा येथे रास्ता रोको आंदोलनात असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती…

भंडारा: आज लाखांदुर तालुक्यातील बारव्हा टी पॉईंट येथे दहेगाव येथील कायनाईट खान सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या च्या वतीने रास्ता रोको जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर खनिकर्म विभाग भंडारा व तहसीलदार, लाखांदूर यांच्या मार्फत 60 ग्रामपंचायतचे ठरावा सह प्रधानमंत्री भारत सरकार यांना कायनाईट खान सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आली.
तालुक्यातील दहेगाव येथील कायनाईट खान मागील तीस वर्षापासून बंद पडली असून त्यातील तीन हजारहून अधिक काम करणाऱ्या लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, तालुका अध्यक्ष बालू भाऊ चुन्ने यांच्या नेतृत्वात आज बारव्हा टी पॉइंट येथे चक्काजाम जन आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारव्हा येथिल मैदानावर परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाची सुरवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रा.काँ महासचिव धनंजय दलाल, बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी जि प सदस्य विजय सावरबांधे, साकोली विधानसभेचे अध्यक्ष हेमकृष्ण वाडिभस्मे यांच्या उपस्थिती मध्ये आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. आंदोलनस्थळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दहेगाव खान सुरू करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. दहेगाव येथील कायनाईट खान सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी. यामुळे या भागातील 3000 बेरोजगारांचा प्रश्न असून सुद्धा केंद्र सरकार मात्र याकडे डोळेझाक करीत असल्यामुळे केंद्र सरकारचे डोळे उघडण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर खासदार प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात येत्या काळात पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातत्याने प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत दहेगाव खान सुरू होत नाही व बेरोजगारांना रोजगार मिळत नाही. तोपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते स्वस्त बसणार नाही. यावेळी बी डी सी सी चे अध्यक्ष सुनील भाऊ फुले यांनी सुद्धा दहेगाव खान सुरू करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र लढा देणार असून यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले. तर यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून या परिसरातील बेरोजगारांचे प्रश्न गंभीर असून ते सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे राहील असे मत व्यक्त केले. सभा संपल्यानंतर साकोली लाखांदूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारला जाग येण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी गजभिये तहसीलदार अखिल भारत मेश्राम नायब तहसीलदार देविदास पाथोडे यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन देऊन त्वरित दहेगाव खान सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, रा.काँ महासचिव धनंजय दलाल, बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी जि प सदस्य विजय सावरबांधे, साकोली विधानसभेचे अध्यक्ष हेमकृष्ण वाडिभस्मे , बालूभाऊ चुन्ने, मोहन राऊत, राकेश राऊत, राकेश झोडे, शंकर खराबे, देवीदास राऊत, सुधनवा चेटुले, सुभाष दिवठे, मंगेश ब्राह्मणकर, सूरज मेंढे, चंदन गायकवाड, कल्पना जाधव, सुनीता बिसेन,राजश्री मालेवार, गीता लंजे, निशा बघमारे, शकुंतला भैया, मिलिंद डोंगरे, रहिम मेश्राम, रजनीकांत खंडारे, ललित दाने, राऊत, मनोज ठाकरे, पिंटू भागड़कर, वसंता तरहेकर, उमेश वनसकर, अंगद धकाते, सुद्धोधन टेंभुर्णे, संजू नहाले, कैलाश रामटेके, नरेश ताम्बूलकर, रोहित मेश्राम, रेशिम परशुरामकर, शांता चौहान, संतोष गोंधळे, अर्जुन धरत, किशोर बघमारे, रोशन लोथे, हितेश झोड़े, रेवा देशाई, धनराज वासनिक, अंकुश खराबे, सदीप राऊत, मानबिंदु दहीवले, अमित फुलबांधें, सुशीला सखोडे, धनमाला सोनपीमपले, जिकरिया पठान, देवानंद नागदेवे, बंडू सोंदरकर, देवेंद्र बोकडे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते ऊपस्थित होते.

Related posts