मोठा निर्णय: आता आरोग्य विभाच्या अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षापर्यंत

315 Views

 

प्रतिनिधी। 14 जुलै

मुंबई – मागील एक वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना महामारीचं संकट उभं राहिलं आहे. या महामारीनं लाखो लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना काळात आरोग्य विभागातील त्रुटींची प्रखरतेने जाणीव झाली. अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे अनेकांचे प्राण गेले. कोरोना महामारीनं आरोग्य या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. त्यामुळे अनेक देश आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देत आहेत.

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून आला. अनेक पदं रिक्त असल्याने सक्रीय कर्मचाऱ्यांवर ताण पडला. कोरोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी निवृत्त होत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत याच संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली आहे.

Related posts