पांढराबोडी, नागरा, बिरसोला व काटी जि. प. क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बैठक संपन्न

325 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया: आज गोंदिया तालुक्यातील पांढराबोडी, नागरा, बिरसोला व काठी, जि. प. क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस भवन, मध्ये या क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्तांची बैठक पार पडली.

यावेळी माजी आमदार श्री जैन संबोधनात म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेल यांनी शेतकऱ्यांना बोनस मिळवून देणे तसेच रब्बी धान खरेदीला मुदतवाढ देणे व शेतमजूर वर्गाच्या हितासाठी तसेच कोवीड संक्रमण काळात आरोग्य सुविधा बाबतीत जे कार्य केले आहे त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, खोटे बोलून ज्या लोकांनी शेतकर्‍यांच्या मालाला दुप्पट भाव देऊ असे आश्वासन दिले होते आज त्यांनीच डीजेल महाग केल्याने शेतकर्‍यांच्या मशागतीचा खर्च दुपटीने वाढलेला आहे, विरोधक फक्त शेतकरी हिताचा बावु करतात प्रत्यक्षात कोणत्यही कार्य दिसत नाही.

पेट्रोल, खाद्यतेल महाग झाल्याने सामान्य जनतेला महागाईचा अतिरिक्त आर्थिक बोझा सहन करावा लागत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर संबोधनात म्हणाले की, खा.प्रफुल पटेल यांनी केलेल्या विकास कामाचा प्रसार प्रचार करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे, आपण कामे अधिक करतो पण प्रचार प्रसार करीत नाही.प्रत्येक बुथ वर किती लोकसंख्या आहे याचा विचार करून प्रत्येक माणसाला जोडण्याचे काम करावे. जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रमुखांना सुचना करीत जि.प.पर्यवेक्षक व बुथ प्रमुखांनी प्रत्येक गावात बैठक लावुन नियोजन करण्याचे काम करावे व प्रत्येक घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोहचविण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक बुथ पातळीवर कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे व जि.प. व प. स. निवडणूक बाबतीत पक्ष संघटन मजबूतीबाबद चर्चा केली.

यावेळी माजी आमदार राजेन्द्र जैन, यांच्यासोबत विजय शिवनकर, श्रीमती राजलक्ष्मीताई तुरकर, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, गणेश बरडे, जितेश टेंभरे, मोहन पटले, गोविंद तुरकर, चंदन गजभिये, सुनील पटले, शैलेश वासनिक, रजनी गौतम, उषा मेश्राम, धनंजय गुप्ता, वर्षाताई पंधरे, सतीश कोल्हे, डाँ रुपलाला चिखलोंढे, तेजलाल येडे, नानू मूदलीयार, राजेश नागपुरे, खोमेंद्र कटरे, गुलाब नागदिवे, अश्विन ढोमणे, रिताराम लिल्हारे, सिमत चौधरी, कालु चव्हाण, नेमिचंद ढेकवार, शिवकुमार पांडे, बबलु तुरकर, रामेश्वर हिरापुरे, मानीक पडवार,संजय कटरे, गोकुलप्रसाद डोहरे, खेमचंद डोहरे, सुकलाल बाहे, अनिल बावनकर, रामकुमार कवास, राजेश माने, फागुलाल नागफासे, राजू पाचे, मन्साराम मानकर, भुवनसिह हलमारे, राजेश रामटेके, सुरेश भिमटे, किरण बन्सोड, प्रेमलाल बरैया, हिरालाल कटरे, निहाल तुरकर, नितीन मेश्राम, राजेंद्र गेडाम, राजेश बनकर, प्रकाश बरैया, सनम कोल्हटकर, चमरु बोपचे, कुणाल ढेकवार, धनराज बनकर, भौतीक मेश्राम, रामेश्वर मानकर, भारत मेश्राम, रमेश कटंगकार, हरि कटंगकार, राजुभाऊ तुरकर, जाफर पप्पी शेख, योगराज गराडे,जितेन्द्र ढेकवार, गिरजाशंकर माहुले, श्यामराव लिल्हारे, संजु कटरे, जयेश उके, गरीब पाचे, राजेश नागपुरे, विशाल बोरकर, रंजित शेंडे, दिपक साठवणे, अनिल रहांगडाले, सेजराम नागपुरे, शिवलाल जामरे, बबलु कटरे, जितेंद्र ढेकवार, कान्हा बघेले, भारत मेश्राम, नरेंद्र बेळगे, रौनक ठाकूर व तालुक्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे दासगाव बु. येथील कार्यकर्तानी मा.श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी उपस्थित माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष  विजय शिवनकर यांनी कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ व पक्षाचा दुप्पटा वापरुन पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेशित सर्वश्री अ. मलीन कुरेशी, लोकेश जगने, नजीम शेख, राज बोपचे, अभय गोले, इमरान शेख व अन्य कार्यकर्तांनी पक्ष प्रवेश केला.

Related posts