जनतेत भ्रम निर्माण करण्याऱ्यांना त्यांची जागा दाखवा – माजी आमदार श्री राजेंद्र जैन

706 Views

 

देवरी: 8 जुलाई

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका देवरी च्या वतीने जिल्हा परिषद क्षेत्र पुराडा अंतर्गत श्री नुतनजी गौतम यांचे निवासस्थान सावली, जि.प.क्षेत्र गोटाबोडी अंतर्गत शिवराम विद्यालय मुरदोली व नगर पंचायत देवरी अंतर्गत माॅ धुकेश्वरी मंदिर सभागृह देवरी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली.

या सर्व बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्तां सोबत पक्ष संघटन मजबूत करणे, पक्ष बांधणी व पक्ष विस्तार, बुथनिहाय चर्चा, आगामी पं.स., जि.प. व नगरपरिषद च्या निवडणुका बाबद क्षेत्र व वार्ड निहाय चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी श्री राजेंद्र जैन आपल्या संबोधनात म्हणाले की, मा.श्री प्रफुल पटेल यांनी शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला, शेतकर्‍यांच्या खात्यात बोनस चे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, जे लोक शेतकर्‍यांच्या मालाला दाम दुप्पट भाव देऊ म्हणतात, अच्छे दिनाचे स्वप्ने दाखवतात पण निवडणुकी नंतर विसरुन जातात त्यांना कुणी प्रश्न विचारत नाही, विरोधक सामान्य जनतेत भ्रम निर्माण करण्याचे काम करतात त्यांचा भ्रम निरास करा व विरोधक शेतकरी विरोधी आहेत हे कृषी बिलाच्या अनुषंगाने जनतेला समजावून सांगण्याचा काम कार्यकर्त्यांनी करावे, कोविड सारख्या संकट काळात खासदार श्री पटेल यांनी केलेल्या कार्याची जनतेपर्यंत माहिती द्या. केंद्र सरकार शेतकऱ्यांची पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ करुन सामान्य जनतेची पिळवणूक करण्याचे काम करीत आहे. खासदार श्री पटेल यांनी काही दिवसांपूर्वी नगर विकास मंत्री ना. श्री एकनाथ शिंदे जी यांच्या सोबत बैठक घेतली व गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील मागील सरकारच्या काळात रखडलेली विकास कामे पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा केली यावेळी दोन्ही जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना.श्री शिंदे जी यांनी दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकरजी यांच्या सह वरिष्ठ मान्यवरांनी पार्टी संगठन मजबुतीने कार्य करण्यासोबतच बुथ पातळीवर पक्ष संघटन, पक्षाचा विस्तार करण्यासाठी गावा- गावात बुथ कमेटी स्थापण करुन पक्ष संगठन मजबूत करणे, बाबद चर्चा व मार्गदर्शन केले.

या बैठकांना माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन यांच्या सोबत उपस्थित सर्वश्री विजयभाऊ शिवणकर – जिल्हाध्यक्ष, सी के बिसेन, रमेशभाऊ ताराम, गोपाल तिवारी, सौ.पारबताबाई चांदेवार, भैय्यालाल चांदेवार, चंचल जैन, मुन्नाभाई अंसारी, सुमन बिसेन, मुकेश खरोले, शर्मिला टेंभुर्णीकर, नेमीचंद आंबिलकर, जाकिरभाई, अर्चनाताई ताराम, मंजूषा वासनिक, सुजित अग्रवाल, योगेश जैन, दिपेश टेंभरे, दिनेश गोडसेलवार, उषाताई तिवारी, रुपाली गोडसेलवार, प्रमिला गावळ, अशोक चनाप, लक्ष्मी मेश्राम, कैलास टेंभरे, कोमल खरोले, तुकाराम वाघमारे, गेजी भाटिया, पुष्पाताई मस्के, जयेश मस्के, डाँ नरेश कुंभरे, पंकज शहारे, सारंग देशपांडे, सुबोध देशपांडे, दिलीप दखणे, मनोहर राऊत, हरिभाऊ राऊत, विणाताई आचले, गुणवंताबाई कवास, मंजुळाताई वासनिक, हुकरेताई, धर्मराज मानकर, यशवंत शिवनकर, केशव मेंढे, सावलराम डोये, प्रेमलाल मळकाम, यानेश्वर खोब्रागडे, नाईकजी, राजू भेंडारकर, श्रावण बिंझलेकर, सुखदेव सोनवाने, केवलराम कोरे, रिता शिवणकर, झुलनबाई रमेश पंधरे,राजेश्वरीबाई अविनाश बिंजलेकर,नाजूका बाई नूतन गौतम,सुजीतकुमार अग्रवाल, नुतन गौतम, अविनाश बिंझलेकर, सुरेश पंधरे, प्रविण सोनटक्के, सेवक बारसे, कैलाश कुंजाम, कैलाश मरस्कोल्हे, दिपक चुटे, प्रशांत देसाई,व पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी महिला पदाधिकारी आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts