आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यावरच आली आपत्ती…सर्किट हाऊस सामोर राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबियांसह झाला अपघात, कार चालकावर FIR दाखल

447 Views

 

गडचिरोली: सावधान कोरोना काळात घरीच राहा, घराबाहेर पडले की अपघात निश्चितच होईल, ही सूचना गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी आहे. कारण घरी राहाल तेव्हाच सुरक्षित राहाल. परंतु एखाद्या कामानिमित्त जर घरा घराबाहेर पडले की अपघात होणार, असे अनुभव गडचिरोलीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांना 25 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता झालेल्या अपघातात अनुभव आले.

सायंकाळी कुटुंबासह कामानिमित्त गेलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचे गडचिरोली शहरातच नगर परिषद क्षेत्रात असलेल्या सर्किट हाऊस च्या समोर राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे नसताना एका अनियंत्रीत कार चालकाने MH-33 A-4131 त्यांच्या दुचाकी वाहनाला जबर धडक दिली. एवढेच नव्हे तर सदर कार चालकाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या दुचाकी वाहनाला घासाटून 100 मीटर पर्यंत नेले. रात्री नऊच्या सुमारास यावेळेस सर्किट हाऊसच्या सामोर पथदिवे नसल्यामुळे अंधार होता, त्यामुळे या ठिकाणी काहीच जाणवत नव्हते. राष्ट्रीय महामार्गावर सर्किट हाऊस च्या समोर डिव्हायडर सुद्धा नाही हे म्हणजे विशेष.

यापूर्वी ही या ठिकाणे अनेक अपघात होऊन काही लोकांच्या मृत्यू सुद्धा झालेला आहे. एवढे असून ही स्थानिक प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागाला जाग यायचाच आहे.
आपले अनुभव सांगताना रेड्डी म्हणाले की रात्रीच्या वेळेस सर्किट हाऊस सामोर अंधार असल्यामुळे आपल्या मार्गाने जात असताना मागून एका अनियंत्रीत कार चालकाने आम्हाला धडक दिले व 100 मीटर पर्यंत पुढे घासाटून नेले. तेवढ्यात आम्ही त्याला हात पण दिले, गाडी थांबवा, ब्रेक मारा, एवढे सांगून ही त्या व्यक्तीने गाडी थांबविली नाही. शेवटी त्याच्यावर आम्हाला FIR दाखल करावं लागलं.
या अपघातात माझं दोन वर्षाचा मुलगा हा सुखरूप बचावला परंतु माझी पत्नीला गंभीर दुखापत होऊन मी किरकोड जखमी। झालो आहे. तसेच दुचाकी वाहन अपघातग्रस्त झाले.

सर्किट हाऊस च्या सामोर अनेक अपघात झाले असून या ठिकाणी पथदिवे आणि डीवाईडर तयार करण्याचे विसर स्थानिक प्रशासनाला झाले आहे. परंतु स्थानिक प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे शहरातच अपघात प्रवण क्षेत्राचा निर्माण झाला आहे. सदर अपघातानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रेड्डी यांनी स्थानिक प्रशासनाला दोन पथदिवे लावण्याचा आवाहन केले. जर प्रशासनाकडे दोन पथ दिवे लावण्या करिता ही निधी उपलब्ध नसेल तर आपल्या स्वतःच्या पगारातून दोन पथदिवेसाठी पैसे देण्याचे रेड्डी यांनी सांगितले. यामुळे कुणाचा तरी जीव वाचेल असे ते म्हणाले.

Related posts