गोंदिया: भारत बंदला पाठिबा दर्शविण्यासाठी काँग्रेसचे २६ मार्चला उपोषण

367 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। केन्द्रातील भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळया कृषी कायद्या विरोधात , सदर कायदे केन्द्रसरकारने मागे घ्यावे यासाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सिमेवर मागील १२० दिवसापासून ठाण मांडुन बसले आहेत . या आंदोलन काळात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत . तसेच शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी २६ जानेवारीला दिल्लीत हिंसा घडविण्यात आली . मोदी सरकारने ११ वेळा चर्चेचा देखावा केला परंतु हे तिन कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी माण्य केली नाही . 26 जानेवारीच्या घटने नतंर पंतप्रधानांनी चर्चे चे दरवाजे खुले असल्याची बतावणी केली . परंतू चर्चेस बोलविण्यांत आले नाही . हे तीन काळे कायदे, शेती व्यवसायात व शेतकऱ्यांना पुर्णपणे उध्वस्त करणारे आहेत. या जुलमी कायद्या विरोधात देशातील तमाम शेतकरी पेटून उठले आहेत . या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवाती पासूनच काँग्रेसचा पांठिबा राहिलेला असुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार वेळोवेळी देशभर आंदोलने करण्यात आली.  खा. राहुल गांधी यांनीही पंजाब, हरियाणासह इतर राज्यात रॅली काढून शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे . महाराष्ट्रातून ६० लाख शेतकऱ्यांच्या सहयांचे निवेदन राष्ट्रपतींना देऊन कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे . दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्यागॅस चे दर प्रचंड वाढले आहेत . इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केन्द्र सरकार दिवसाढवळया लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे . पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलेडंर रिफिल 880 रुपयांवर झाला आहे. यावरील सब्सीडी केन्द्र सरकाने बंद केलेली आहे.

महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे . कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे . त्यामुळे गोरगरीब जनता व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे . मात्र हिटलरशाही वृतीचे मोदी सरकार या बाबीवर एकही शब्द बोलायला तयार नाही . म्हणून तीन काळे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्यावर केन्द्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंद पुकारला आहे . या भारत बंद ला काँग्रेस पक्षाने सक्रिय पांठीबा दिला असून नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या निर्देशानुसार पक्षाच्या वतीने शुक्रवार दि . २६ मार्च रोजी सकाळी ११ ते सांयकाळी ४  या वेळेत जिल्हा तालुका मुख्यालयी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व प्रमुख पदाधिकारी उपोषणाला बसणार आहेत . व सर्व कार्यकर्त्यांना उपोषण पाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले हे जेष्ठ काँग्रेस नेत्यांसह मुंबईत उपोषणाला बसणार आहेत . गोंदिया जिल्हयात गोंदिया येथे गांधी पुतळया जवळ व आट ही तालुक्यात काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत .  काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दि . २६ मार्च ला स.११ ते दुपारी ४  चे दरम्यान उपोषण पाळावे असे आवाहन गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. एन.डी. किरसान यांनी केलेले आहे .

Related posts