GONDIA: पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी जाणून घेतल्या कार्यकर्त्यांच्या समस्या

115 Views

 

प्रतिनिधि। 20 एप्रिल

गोंदिया। आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री इंद्रनील नाईक यांची शासकीय विश्राम गृह, गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी पालकमंत्री महोदयांनी कार्यकर्त्यांकडून निवेदनं व समस्या जाणून घेतल्या. खा. श्री प्रफुल पटेलजी यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्याच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले, श्री नरेश माहेश्वरी, श्री सुरेश हर्षे, सौ. राजलक्ष्मी तुरकर यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ मान्यवर पदाधिकारी, सर्व सेल चे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts