तिरोड़ा: मनसेचे जिलाध्यक्ष हेमंत (मन्नू) लिल्हारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

69 Views

 

गोंदिया जिल्ह्याच्या तसेच तिरोडा शहराच्या राजकारणात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री हेमंत (मन्नू) शोभेलालजी लिल्हारे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे मनसे पक्षाला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटन बळकटीसाठी हा प्रवेश लाभदायक ठरणार आहे.

हा पक्ष प्रवेश माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरोडा येथे संपन्न झाला. यावेळी त्यांच्या हस्ते श्री हेमंत लिल्हारे व प्रकाश फटिंग,यांना पक्षाचा दुपट्टा परिधान करून औपचारिक प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी श्री लिल्हारे यांचे मनापासून स्वागत करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला सर्वश्री राजेंद्र जैन, डॉ अविनाश जायस्वाल, अजय गौर, जिब्राईल पठाण, नरेश कुंभारे, प्रभू असाटी, राजेश गुनेरिया, धोंडूजी लिल्हारे, सलीम जवेरी, ओमप्रकाश येरपुडे, बबलू ठाकूर, नागेश तरारे, भोजराम धामेचा, रामकुमार असाटी, विजय बनसोड, संदीप मेश्राम, जगदीश कटरे, प्रशांत डहाटे तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts