राष्ट्रवादी काँग्रेस युवकांना संधी देणार – मा. आ. राजेंद्र जैन

185 Views

 

गोंदिया। खासदार प्रफुल पटेल यांचे व्हिजन हे सर्वांगीण विकासाचे आहे. गोंदिया शहरातील प्रलंबीत समस्याचे निराकरण व शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आपण सर्व युवा कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, युवक जर पुढे आले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच अधिक मजबूत आणि प्रभावी पक्ष म्हणून उभा राहील असे प्रतिपादन माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांनी केले.

आज अग्रसेन भवन, गोंदिया येथे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, आगामी गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवकांना नेतृत्व करण्याची संधी देईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा युवक आणि महिला यांच्या प्रगतीसाठी नेहमीच कटिबद्ध आहे. समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण परिवर्तन घडविण्याचा आमचा संकल्प आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या विकासवादी भूमिका व सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक 21 मधील श्री राहुल वंजारी यांच्या सोबत श्री अर्जुन उके, ओम ठाकरे, नितेश भगत, आदित्य चौहान, कमलेश वंगी, आशिष चेडे, नितेश राणे, निकेश शहारे, प्रवीण घोंगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, नानू मुदलियार, केतन तुरकर, विनीत सहारे, अनुज जायस्वाल, नागो बनसोड, राहुल श्रीवास, अमित अवस्थी, श्रेयस खोब्रागडे, संदेश चौर, विकी बाकरे, हितेश मानकर, शुभम श्याम, प्रकाश चुटे, रजा सोलंकी, खुशाल रहांगडाले, शरब मिश्रा, चंचल चौबे, दिलप्रीत होरा, रोहित माने, तुषार श्रीवास, नफीस सिद्दिकी, लखन बहेलिया, सुनील पटले, छोटू पंचबुद्धे, अमन चौधरी, धर्मासू राऊत, शरद अग्रवाल, राजा पटेल, राहुल वंजारी, मंगेश भुजाडे, अक्षय हाडगे, निशांत बेहरे, प्रफुल भरणे, गुड्डू बीसेन, लव माटे, प्रशांत सोनपुरे, संजय मानकर, तुषार उके, पप्पू वझा, उस्मान शेख, विक्रांत मिश्रा, अनुज तिवारी, गौरव नेवारे, रितिक नागपुरे, राहुल बघेले, बंटी बिसेन, तुषार, ओम बोपचे, राहुल बिसेन, प्रणव मिश्रा, अनु चंदेल, आर डी अग्रवाल, सचिन अवस्थी, सौरभ जयस्वाल, प्रणय पटले, एस राऊत, शुभम सयाम, हितेश मानकर, निखिल पडोळे, कुणाल उपतोडे, राज शुक्ला, अजय तरोणे,दीपक नेवारे, ऋषी नेवारे, निखिल बेंद्रे, हर्षद बेंद्रे, अमित फुंडे, गिरीश आंबेडारे, राजा यादव, भूषण चौरागडे, भुनेश्वर राऊत, आयुष बिरोले, राहुल बाकरे, रवी माडवी, शंभू बारसागडे, करण मेंढे, जितू रावते, चेतन तरवणे, योगेश शेंद्रे, लकी चौधरी, सागर नेवारे, अमन शेख, आकाश दहीकर, अंकित जयस्वाल, शुभम अग्रवाल, राजा सोलंकी, राजा पटेल, तुषार नचवाणी सहित मोठ्या संख्येने युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts