गोंदिया शहरातील अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उत्स्फूर्त प्रवेश

75 Views

 

गोंदिया। आज गोंदिया शहरातील प्रभाग क्र १८ मधील कार्यकर्त्यांनी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या विकासवादी भूमिका व नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवकांचा उत्स्फूर्तपणे प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाचे संघटन मजबूत होणार असून युवकांमध्ये नविन चैतन्य निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून गोंदिया शहर प्रभाग १८ मधील कुणाल महावत, अंकुश कांबळे, रोहित बुलबुल, प्रशांत महाजन, रिषभ शहारे, अमन जायस्वाल, श्रेयश बावनकर, जतीन जायस्वाल, यश सांगिडे, राहुल तोलानी, ओम महावत, हर्षद राऊत, चिन्मय नखाते, उद्देश कांबळे, शुभम दासवानी, गोविंदा पटले, शांतू पटले, हर्ष भाकरे, शिव महावत, प्रणय बागडे, लकी खोब्रागडे, सागर लिणारेश, विक्की वाघाडे, सोनू लोणारे, गोलू महावत, राहुल महावात, प्रदीप वहाणे, प्रथमेश चव्हाण, लकी घोडेस्वार, सौरभ राऊतकार, आकाश मेश्राम, विक्की पारधी, विशाल राऊत, सचिन मानकर, शुभम सोनवाने, अमन तुरकर, विनीत बागडकर, बिट्टू सोनवाने, साहिल बन्सोड, अजय डहारे, सन्नी जतवार, गौरव मोटवानी, सागर लोणारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्स्फूर्तपणे प्रवेश केला.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, माधुरी नासरे, केतन तुरकर, लव माटे, प्रशांत सोनपुरे, अविनाश महावत, टी एम पटले, अविनाश काशीवार, चुन्नीलाल शहारे, सुनील पटले, शैलेश वासनिक, रौनक ठाकूर सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts