भंडारा। खासदार प्रफुल पटेल हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांनी भंडारा शहरातील विविध श्री गणेश उत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन व आशिर्वाद घेतले.
या प्रसंगी गणेशपूरचा राजा – सन्मित्र गणेश मंडळ (गणेशपूर), मानाचा महागणपती – नवबजरंग गणेशोत्सव मंडळ (बजरंग चौक), म्हाडाचा गणपती – म्हाडा कॉलनी, भृशुंड गणेश मंदिर – मेंढा रोड तसेच भंडाराचा राजा – गणेश उत्सव मंडळ (छोटा बाजार गांधी चौक) येथे जाऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व सर्व जनतेचे जीवन सुख, समृद्धी व मंगलमय क्षणांनी परिपूर्ण होवो अशी प्रार्थना केली.
खासदार श्री प्रफुल पटेल यांनी सर्व मंडळांतील पदाधिकारी व उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या समवेत सर्वश्री नाना भाऊ पंचबुद्धे, सुनील फुंडे, श्रीकांत शिवणकर, अनिल अहिरकर, एकनाथ फेंडर, सरिता मदनकर, यशवंत सोनकुसरे, नरेंद्र झंझाड, महेंद्र गडकरी, शेखर गभने, हेमंत महाकाळकर, मनीष वासनिक सहित मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते.