गोंदिया। राजकारणात काम करताना काही मतभेद निर्माण होणे साहजिक आहे. परंतु ते मतभेद कधीही मनभेदात रूपांतरित होऊ देवू नयेत. महायुती ही विकास आणि जनतेच्या हितासाठी बांधलेली आघाडी आहे. कार्यकर्त्यांनी परस्परांमध्ये एकजूट ठेवून, परस्परांचा सन्मान राखून पुढे काम केले पाहिजे असा महत्त्वपूर्ण सल्ला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिला.
आज गोंदिया येथील एन.एम.डी. महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम मध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीच्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात खासदार श्री प्रफुल पटेल बोलत होते.
यावेळी खा. श्री प्रफुल पटेल म्हणाले की, महायुतीतील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपल्या विचारधारेनुसार कार्य करतात, परंतु जेव्हा आपण एकत्र आलो आहोत तेव्हा जनतेसाठी आणि विकासासाठी एकच ध्येय ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्याची प्रगती व सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून आपण पुढे जायचे आहे.
सत्कार कार्यक्रम प्रसंगी खा.श्री प्रफुल पटेलजी, आमदार श्री परिणय फुके, आमदार श्री विजय रहांगडाले, माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री राजकुमार बडोले, आमदार श्री राजुभाऊ कारेमोरे, आमदार श्री विनोद अग्रवाल, आमदार श्री संजय पुराम, श्री नानाभाऊ पंचबुद्धे, श्री बाळाभाऊ अंजनकर, श्री सुनिल फुंडे, श्री धनंजय दलाल, श्री किरण पांडव, श्री मुकेश शिवहरे, श्री विलास काटेखाये, श्री केशव मानकर, श्री भेरसिंगभाऊ नागपुरे सह अनेक मान्यवरांची उपस्थित होते.
सत्कार कार्यक्रमात गोंदिया जिल्हा व भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भंडारा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. भंडारा, भंडारा जिल्हा कृषी औधोगिक संघ, भंडारा. भंडारा दुग्ध संघ मर्या,भंडारा. कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा, कृषी उत्पन्न बाजार समिती पवनी, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर, गोंदिया जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघ, गोंदिया येथील संचालक व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
महायुतीतील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील संचालक मंडळ, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.