खासदार प्रफुल पटेल १६ व १७ ला भंडारा – गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर

66 Views
गोंदिया। खासदार प्रफुल पटेल यांचा १६ व १७ आगष्ट २ दिवसीय भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटी व नुकत्याच संपन्न झालेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल नव निर्वाचित संचालक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या दरम्यान  १६ आगष्ट २०२५ शनिवार ला दुपारी १२.३० वाजता पतंजली मेगा स्टोर, शास्त्री चौक, भंडारा येथे चेतन भैरम, संपादक, देशॊन्नती यांच्या निवास स्थानी भेट, दुपारी १.०० वाजता राष्ट्रवादी जनसपंर्क कार्यालय, येथे भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता बैठक, सायंकाळी ५.०० वाजता भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी, बहुउद्देशीय सभागृह तिरोडा, जिल्हा गोंदिया येथे तिरोडा तालुका व शहर कार्यकर्ता बैठक आयोजित केली आहे.
दिनांक १७ आगष्ट २०२५ रविवारला सकाळी १०.०० ते ११.०० पर्यंत रामनगर बगीचा, गोंदिया निवास स्थान येथे कार्यकर्ता भेट, सकाळी ११.३० वाजता एन. एम. डी. कॉलेज ऑडिटोरियम, गोंदिया येथे गोंदिया – भंडारा जिल्हा महायुती सहकार क्षेत्रातील नवनिर्वाचित संचालक व पदाधिकारी यांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला पक्षातील वरिष्ठ नेते कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts