भटके विमुक्त विभागाच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी विनोद कन्नमवार यांची नियुक्ति

200 Views

 

गोंदिया। राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवारजी व पक्षाचे कार्याध्यक्ष तथा खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या आदेशानुसार गोंदिया जिल्ह्यात विमुक्त भटक्या जाती/जमाती यांचे संघटन अधिक मजबूत करणे व पक्षाची विचारधारा व विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भटके विमुक्त विभागाच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी श्री विनोद भैय्याजी कन्नमवार आमगाव यांची नियुक्ती करण्यात आली. आज खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयात, गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते व सौ.टीशा माडेवार, सरचिटणीस, श्री राणाभाउ रणनवरे प्रदेश संघटक सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विनोद कन्नमवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. या नियुक्ती बद्दल जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी श्री सर्वश्री राजेंद्र जैन, सौ.टीशा माडेवार सरचिटणीस, श्री राणाभाउ रणनवरे प्रदेश संघटक सचिव, श्री आशिष ठाकरे जिल्हा कार्याध्यक्ष, श्री निलेष खोंड गटनेता शहर अध्यक्ष, श्रीमती भावना वाडीभस्मे महिला अध्यक्ष, श्री मयुर डफळे युवक जिल्हाध्यक्ष, वर्धा, श्रीमती प्रियंका तांबेकर महिला कार्याध्यक्ष, श्रीमती साधनाताई दांदडे महिला कार्याध्यक्ष, श्री दुश्यंत ठाकरे युवक शहरध्यक्ष, वर्धा, श्री राज दांदडे विदयार्थी जिल्हाध्यक्ष, श्री प्रतिक कावळे युवक जिल्हा उपाध्यक्ष, श्री कपील मुन सामाजिक न्याय अध्यक्ष, श्री आषिश मेश्राम असंघटित कामगार सेल जिल्हाध्यक्ष, श्रीमती शिवानी रणनवरे युवती जिल्हाध्यक्ष, वर्धा, श्री आदित्य येळणे सेलु तालुकाध्यक्ष, श्री देवीलाल जायस्वाल व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष, श्री बाळाभाउ मानकर शहराध्यक्ष हिंगणघाट, श्री हरिश काळे प्रदेश उपाध्यक्ष ओ बी सी सेल, श्री गजानन दुर्गे समुद्रपुर तालुकाध्यक्ष, श्री राजु झाडे जिल्हा उपाध्यक्ष, श्री विनोद हिवंज जिल्हा सरचिटणीस, श्री अकमल शेख शहर उपाध्यक्ष वर्धा, श्री इरफन बेग वर्धा, सुरेश हर्षे, अविनाश काशीवार, केतन तुरकर, नानू मुदलियार, अखिलेश सेठ, रवी पटले, उमेंद्र भेलावे सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts