गोंदिया। आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले खा. श्री प्रफुल पटेल यांनी आरोग्य विभागाच्या व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मागील आठवड्यात श्री पटेल यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.श्री. हसन मुश्रीफ व आरोग्य विभागाचे सचिव व आयुक्त यांच्याशी इमारतीच्या प्रगतीविषयी सविस्तर चर्चा केली होती.
कुडवा येथे 690 कोटी रुपये निधीतून अत्याधुनिक सुविधा असलेली नवीन इमारतीत ६५० खाटांची रुग्णसेवा व 150 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण या महाविद्यालयात होणार आहे.
खासदार श्री. प्रफुल पटेल हे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम वेळेत व दर्जेदार बांधकाम होईल असा विश्वास यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.