गोंदिया: बेटर गोंदिया च्या पुढाकाराने, ५ हजार लोकांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्र-गान व तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन – जनजागृतीसाठी आदर्श पुढाकार

46 Views

 

गोंदिया, दि. 26 जानेवारी 2025: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने “बेटर गोंदिया” यांच्या पुढाकाराने आणि विविध गैर सरकारी संस्थां, समुदाय यांच्या सहभागितेने एक विशेष उपक्रम गोंदिया जिल्ह्यात आयोजित करण्यात आला. नेहरू चौक येथे सामूहिक राष्ट्र-गान आणि तिरंगा सन्मान यात्रेद्वारे जिल्ह्यातील स्थानिक सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर जनजागृती निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:10 वाजता शंकर चौक येथून तिरंगा सन्मान यात्रेने झाली. विविध संघटन, संस्था, व समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यात दिसून आला. यात्रेचे समारोप नेहरू चौकात सकाळी 11:30 वाजता करण्यात आले.

नेहरू चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमात माननीय जिल्हाधिकारी गोंदिया आणि Better गोंदिया च्या सदस्यांनी उपस्थित नागरिकांना जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक राहण्याचे व त्यावर उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण झाले. यानंतर ठीक 12.12 मिनिटांनी सामूहिक राष्ट्र-गान करण्यात आले आणि सर्वांना सामाजिक एकजूट व सक्रिय सहभागाची शपथ देण्यात आली.

Better गोंदिया व इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर प्रकाश टाकत त्यांच्या निराकरणासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून नागरिकांना समाज कल्याणासाठी सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले.

या उपक्रमाने फक्त राष्ट्रप्रेम जागृत केले नाही, तर सामाजिक समस्यांवर विचार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमात हजारो नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, आणि स्थानिक नेत्यांनी सहभाग घेतला.

टीम बेटर गोंदिया कडून डॉ. विकास जैन , अपूर्व मेठी, सावन बहेकार, दिलीप जैन, तरुण मनुजा, विपलोव जयस्वाल, शैलेश अग्रवाल व टीम बेटर गोंदिया च्या असंख्य स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या सहभागीतेने अथक प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रजित नायर व बरेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच शहरातील असंख्य जनप्रतिनिधी व मान्यवर उपस्थतीत होते.

बेटर गोंदिया आणि सहभागी संस्थांनी भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला आणि समाजातील प्रत्येक घटकाला या मोहिमेत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमात पाच हजार लोकांनी गोंदिया शहराच्या भल्यासाठी खालील सकंल्प घेतले.

1. मी गोंदियाला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी योगदान देईन.

मी नेहमी कचरा फक्त कचरापेटीत टाकीन आणि कचरापेटीतील कचरा फक्त कचरा उचलणाऱ्या गाडीतच टाकेन.

मी पॉलिथीन किंवा डिस्पोजेबल वस्तूंचा वापर केवळ अत्यावश्यकतेनुसारच करीन.

2. मी वाहतुकीचे नियम पाळेन.
मी मद्यपान करून वाहन चालवणार नाही आणि वाहन चालवताना कधीही मोबाईलचा वापर करणार नाही.

3. मी ड्रग्ससारख्या भयावह व्यसनांपासून नेहमी दूर राहीन.

4. मी जबाबदार, सक्रिय आणि जागरूक नागरिक बनेन.

5. मी नेहमी महिलांचा आदर करेन.

माझी ही छोटी सुरुवात माझ्या गोंदियाला आणि भारताला चांगले बनवण्यासाठी योगदान देईल.

मी हेही संकल्प करतो की मी किमान ४ लोकांना “सुदृढ गोंदिया”चा हा संकल्प घेण्यास प्रवृत्त करीन.माझं गोंदिया, माझी जबाबदारी
माझं गोंदिया, सुदृढ गोंदिया.

Related posts