25 वर्षापासून नुसत्या भुलथापा देणारे स्वयंघोषित भूमिपुत्राला धड़ा शिकवा – खा. प्रफुल पटेल

81 Views
साकोली। या क्षेत्रातील मतदारांना विकास हा शब्द माहित आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. 2014 ला आम्ही मुंडीपार (साकोली) येथे हजारो युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी भेल प्रकल्प आणलाय परंतु त्यानंतर जे प्रतिनिधी आलेत त्यांनी या भेलचं भेलपुरी करून हजारो युवकांच्या रोजगार व त्यावर आधारित येणाऱ्या व्यवसायावर कुऱ्हाड मारण्याचे काम केले. 2014 मध्ये ज्यांना निवडून दिले त्यांनी त्या कारखान्याकडे लक्ष दिले नाही परिणामी या क्षेत्रातील हजारो युवक बेरोजगार आहेत.
साकोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री अविनाश ब्राह्मणकर एक सज्जन व सर्वसामान्य लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा माणूस आहे. सज्जन माणसाच्या पाठीशी राहून बहुमताने निवडून द्या. मागील पंचवीस वर्षे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व ज्यांनी केले त्यांनी नुसत्या भुलथापा मारून कोणतेही काम केले नाही. या क्षेत्रात सिंचन असो भेल असो किंवा लाखांदूर येथील साखर कारखाना असो हे सर्व कामे आम्ही केले. नेरला उपसा सिंचनाच्या कालव्याद्वारे परिसरातील शेतीला सिंचन होणार असून शेतकरी सुखी व समृद्ध होईल, अशी अनेक विकासाची कामे आम्ही केली जे स्वतःला भूमिपुत्र म्हणून घेतात त्यांनी मागील पंचवीस वर्षात कोणती विकासाची कामे केलीत हे विचारण्याची वेळ आलेली आहे. विकासासाठी विचार करा व परिवर्तन करून या भागातील शेतकरी, कष्टकरी, युवक, महीलांच्या उत्थानासाठी विकासाची दारे खुली करा असे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी मुरमाडी/तूपकर येथे संपन्न झालेल्या सभेला संबोधित करताना केले.
सभेला सर्वश्री सुनील मेंढे, नानाभाऊ पंचबुद्धे, शिवराम गिऱ्हेपुंजे, सुदामशहारे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, डॉ विजयाताई नंदुरकर, सौ भाग्यश्री गिलोरकर, सौ सुषमाताई चुटे, यशवंत सोनकुसरे, धन्नू व्यास, दादूरं खोब्रागडे, हेमंत ब्राह्मणकर, ईलमकर सर, उमराव आठोले, जितेंद्र बोन्द्रे, श्रावण कापगते, प्रकाश चुटे, सुरेश झंझड, भारत मारवाडे, भागवत बारसकर, पवन ब्राह्मणकर, नामदेव गिलोरकर, भाऊराव गिलोरकर सहित मोठया संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts