स./अर्जुनी येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद संपन्न, बुद्ध विहार समित्यांना थाईलैंड येथून आणलेल्या बुद्ध मूर्तींचे वाटप

1,213 Views

 

प्रतिनिधी / 26 आगस्ट

सडक अर्जुनी : सड़क अर्जुनी येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बुद्ध विहार समितींना थायलँड येथून आणलेली बुद्ध मूर्ती चे वाटप करण्यात आले आणि धम्म स्कूल चे भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येंने समाजबांधवांची उपस्तिथी होती. कार्यक्रमाला प्रामुख्याने मा. प्रा. डॉ. संदेशजी वाघ, मा. अनिलजी हिरेखन, उप मठाधीश वाट थाँग शाही मठ बँकॉक थायलँड व्हेन. फ्राखरू शिलाखुंसमोथन, अभिनेते गगनजी मलिक, कॅ. डॉ. नटकिट सी. मंगल, मा. डॉ. चंद्रबोधी पाटील उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांचे भव्य स्वागत माजी मंत्री राजकुमार बडोले फौंडेशन यांच्या तर्फे करण्यात आले.

बुद्ध धम्म मानवी विकारावर अमृताचा वर्षाव करतो : माजी मंत्री राजकुमार बडोले

बुद्ध धम्म एक जीवनशैली आहे. आपण सर्वांनी आचरणातून समृद्ध व्हावे म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी सत्य अहिंसा आणी शिल चे पालन करण्यासाठी बुद्धाचा धम्म दिला. बुद्ध हा मानवी विकारावर अमृताचा वर्षाव करतो. त्यामुळे आपण सर्वांनी बुद्धांच्या मार्गाचे अवलोकन केले पाहिजे आणि आपले जीवन समृद्ध केले पाहिजे असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

यावेळी त्यांनी अभिनेते गगनमलिक यांनी बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. प्रत्येक बुद्ध विहारात बुद्ध्त्वाचा वास व्हावा यासाठी कटीबद्ध असून प्रत्येक बुद्ध विहार समित्यांना थाईलैंड येथून आणलेल्या बुद्ध मूर्तींचे वाटप त्याच दृष्टीने करण्यात येत आहे. बुद्ध मूर्तींच्या वाटपासाठी एकूण ३६ अर्ज प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने बुद्ध मूर्ती वाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित, वाट थाथोंग-शाही मठ बँकॉक थाईलैंड येथील उप मठाधीश व्हेन.फ्राखरू शीलाखुंसमोथन, राजकुमारजी बडोले माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, डॉ.संदेशजी वाघ विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ, गगनजी मलिक फिल्म ॲक्टर, डॉ. नटकीट सी. मंगल वाट थायोंग-शाही मठ बँकॉक थाईलैंड, डॉ. चंद्रबोधी पाटील विश्वस्त अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, संजयजी पुराम माजी आमदार, डॉ.वर्षाताई गंगणे विभाग प्रमुख अर्थशास्त्र देवरी, शारदाताई बडोले संचालक कृ.उ.बा.स. अविनाशजी काशीवर सभापती कृ.उ.बा.स. यशवंत परशुरामकर सभापती कृ.उ.बा.स. अनिरुद्धजी कांबळे तहसीलदार अर्जुनी/मोर, राजहंसजी ढोके उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र, अंजनाताई खुणे प्रसिद्ध कवयित्री झाडीपट्टी, चो ग्याल्टसेन अध्यक्ष स्थानिक विधानसभा तीबेटीयन बस्ती महाराष्ट्र, शब्बीरभाई पठाण सामाजिक कार्यकर्ता साकोली, भंते फ्रम्हहा सिरीचय यनावत्थानो प्रशासनिक कार्यालय वाट थायोंग-शाही मठ बँकॉक, भंते संघधातू डव्वा, लायकरामजी भेंडारकर गटनेता जि. प. गोंदिया, विजयजी कापगते तालुकाध्यक्ष अर्जुनी/मोर, लक्ष्मीकांतजी धानगाये तालुकाध्यक्ष सडक/अर्जुनी, डॉ.लक्ष्मणजी भगत जिल्हा परिषद सदस्य डॉ.भुमेश्वरजी पटले जि. प. सदस्य, कविताताई रंगारी जि. प.सदस्या, पौर्णिमाताई ढेंगे जि. प. सदस्या, निशाताई तोडासे जि. प. सदस्या, होमराजजी पुस्तोडे उपसभापती पं. स.अर्जुनी/मोर, वर्षाताई शहारे पं. स. सदस्य, शालिनीताई डोंगरे उपाध्यक्ष महिला मोर्चा महाराष्ट्र, चेतनजी वलगाये पं. स.सदस्य सडक/अर्जुनी, उमाकांजी ढेंगे माजी सभापती जि. प. गोंदिया, केवळरामजी पुस्तोडे उपाध्यक्ष ता.ख. वि. अर्जुनी/मोर, काशीम जमा कुरेशी माजी सभापती कृ.उ.बा. समिती अर्जुनी/मोर, तानेशजी ताराम माजी सभापती पंचायत समिती अर्जुनी/मोर, रूपालीताई टेंभुर्णे माजी जि. प.सदस्या, शीलाताई चव्हाण माजी जि. प. सदस्या तेजूकलाताई गहाणे माजी जि.प.सदस्या, अजितजी मेश्राम महामंत्री अनुसूचित जाती गोंदिया

Related posts