1,068 Views
12 आगस्ट/वार्ताहार
गोंदिया। वन्यजीव करीता कर्दनकाळ ठरत असलेल्या चंद्रपूर गोंदिया रेल्वे लाईन वर , वडसा व गोंदिया वन विभागाच्या सीमेजवळ वडसा वन विभागातील गांधीनगर जवळ कक्ष क. ९७ मध्ये आज सकाळून मालवाहक गाडी मध्ये येऊन वयस्क मादा वाघिणीचे मृत्यू झालेले आहे.
सदर लाईनवर आठवड्यातून अनेकदा घटना होत आहेत , सदर लाईनवर सवेंदनशील क्षेत्रात प्रतिबंधात्मक (मिटिगेशन मेजर्स) तातडीने करणे गरजेचे आहे.
घटना स्थळावर धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक वडसा, प्रमोद पंचभाई उपवनसंरक्षक गोंदिया, सावन बहेकार मानद वन्यजीव रक्षक गोंदिया, अनिल दशरे NTCA, RRT गडचिरोली, RRT नवेगाव व वन विभागाचे कर्मचारी घटना स्थळावर पोहचून क्षेत्राची पाहणी करून वाघाला शवणीच्छेदणा करीता हालविण्यात आले.