अखेर आ. फुके यांच्या प्रयत्नामुळे साकोली आणि लाखांदूरला पाणीपुरवठ्याची भेट, मिळाले 30-30 कोटी रुपये…

200 Views

राज्य शासनाने महाराष्ट्र स्वर्णजयन्ती नगरोत्थान महाअभियान योजनांतर्गत दिली मंजूरी..

भंडारा.  23 जुलै

वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली या जोरावर शहरीकरणात मोठा बदल झाला आहे.  मात्र शहरी व नागरी भागात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी पाणीपुरवठा जीवनासाठी अत्यावश्यक असून, याचे संकट भंडारा जिल्ह्यातील साकोली नगरपरिषद व लाखांदूर नगर पंचायतीमध्ये तीव्र निर्माण झाले आहे.

या जलसंकटावर राज्य सरकारचे लक्ष वेधून साकोली व लाखांदूरच्या जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार डॉ.परिणय फुके सातत्याने प्रयत्न करत येत आहेत.

विशेष म्हणजे ही योजना महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत साकोली नगरपरिषद व लाखांदूर नगर पंचायतीसाठी यापूर्वी मंजूर करण्यात आली होती, मात्र त्या वेेेळी ई-निविदेच्या आधारे सादर करण्यात आलेल्या कमी दराच्या निविदा अंदाजपत्रकापेक्षा 11.18 टक्के जास्त असल्याने नगरपरिषद व नगर पंचायतींवर भार पडल्याने ही निविदा रद्द करण्यात आली होती.

साकोली व लाखांदूर शहरांतील रहिवाशांना पाणीपुरवठा या महत्त्वाकांक्षी योजनेची भेट देण्यासाठी डॉ. फुके यांनी सातत्याने प्रयत्न करून पाणीपुरवठा योजनाला साकार करण्यासाठी, सीएसआर दर आणि मूळ संकल्पनेेेत बदल होंणे, जीएसटीचा भार 12 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढवल्याने या प्रकल्पाच्या लागतमध्ये वृद्धि झाल्यामुळे शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली.

अखेर आमदार डॉ.परिणय फुके यांच्या मागणीवरून राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने सकारात्मक पाऊल उचलून आज (23 जुलै) महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत साकोली व लाखांदूरला पाणीपुरवठ्याची भेट देऊन प्रशासकीय मान्यता दिली.

फुके म्हणाले, आता या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार साकोलीसाठी 30 कोटी 12 लाख 21 हजार 358 रुपये आणि लाखांदूर नगर पंचायतीसाठी 30 कोटी 12 लाख 21 हजार 358 रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.  ही कामे लवकरच सुरू झाल्याने साकोली व लाखांदूरच्या नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या संकटातून मोठी दिलासा मिळणार.

Related posts