महायुतीचे सरकार प्रगती व उन्नतीसाठी प्रयत्नशील, जनहिताच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून सहकार्य करा – राजेंद्र जैन

344 Views

 

गोंदिया। आज गोंदिया तालुक्यातील कामठा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कमेटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ताची बैठक श्री बाबू कुंभलवार, खातीया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री कुंदनभाऊ कटारे, श्री गणेश बरडे, श्री केतन तुरकर, श्री रवी पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी परिसरातील समस्यांवर कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बूथ कमेटीचा आढावा घेण्यात आला.

राज्याच्या विकासासाठी जनहिताच्या विविध योजनाच्या माध्यमातून महायुती चे सरकार प्रगती व उन्नतीसाठी प्रयत्नशील असून शासनाने मुख्यमंत्री माझी लाडली बहिन योजना, मुलींना उच्च शिक्षणात १०० टक्के फी माफ, शेतकऱ्यांना वीज माफ या सारख्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घेता येईल यासाठी कार्यकर्त्यांनी सहयोग करावा. खासदार श्री प्रफुल पटेलजी विकासाच्या भूमिकेतून जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. त्यांच्या नेतृत्वात आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानाला बोनस, सिंचनाच्या सोयी, गोंदिया येथे मेडिकल कॉलेज, रेल्वेचा विस्तार व आधुनिकीकरण, शैक्षणिक प्रगती, क्षेत्राच्या विकासासाठी विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून देणे. अनेक जन हिताची कामे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे कार्यकत्यांना संबोधतांना श्री राजेंद्र जैन बोलत होते. जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व गावामध्ये प्रत्येक बूथवर क्रियाशील लोकांची कमेटी बनविणे कमिटीमध्ये महिला, युवक व सर्व घटकांच्या नवीन लोकांना जोडण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे,

सर्वश्री राजेंद्र जैन, कुंदनभाऊ कटारे, गणेश बरडे, केतन तुरकर, रवी पटले, विजय रहांगडाले, विजय लिल्हारे, पृथ्वीराज रहांगडाले, हेमंत कुंभलवार, सुनिल पटले, शैलेश वासनिक, प्रतिक हरिणखेडे, कोमलकुमार नंदागवळी, लोकचंद मुंडेले, बहादुरसिंग यादव, राजकुमार गजभिये, भैयालाल भेलावे, आशिष साहू, विजय मेश्राम, चंद्रशेखर चुटे, खुमेश तांडेकर, रामचंद्र भगत, यशवंत तिघारे, रमेश बरडे, राजकुमार लिल्हारे, हीवकलाल बरडे, रविचंद खोटेले, आत्माराम बरडे, अनंतराम तावाडे, प्रवीण बागडे जितेंद्र मेंढे, खेमेन शेंडे, संजय सहारे, सुधाकर साठवणे, राजू ऊके, अशोक बागडे, ओमराज थेर, अजय तावाडे, श्रीराम जरवार, विनोद बोहरे, मनोज फुंडे, जयकिशन खोटेले, महेश भगत, हिवकराम रहांगडाले सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts