नाना पटोले लढत नसल्याने डॉ. फुके यांचीही माघार, फुके यांनी लढण्यास दिला नकार

802 Views

 

भंडारा : भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास भाजपचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी नकार दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने आपणास देखील लढण्याचे स्वारस्य राहिलेले नाही, असे म्हणत डॉ. फुके यांनी भाजपकडून आपली दावेदारी मागे घेतली आहे.

या संदर्भात डॉ. फुके यांनी सांगितले की, भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या वतीने मी निवडणूक लढावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यापूर्वी मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान दिले होते. पण त्यांनी हे आव्हान न स्वीकारीत निवडणूक लढण्यास नकार दिल्याने मला देखील आता स्वारस्य राहिलेले नाही. त्यामुळे मला निवडणूक लढायची नाही, असे मी पक्षातील वरिष्ठांना कळविले. या मतदार संघातून पक्ष ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्याला बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे देखील डॉ. फुके यांनी सांगितले.

Related posts