गोंदिया: मानव सेवा समितीवर अभिनंदनाचा वर्षाव, राज्य शासना तर्फे फुले शाहू आंबेडकर पुरस्कार प्रदान..

648 Views

 

गोंदिया( ता.-18) गोंदिया तालुक्यातील टेमनी येथील मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टला नुकतेच राज्य शासना तर्फे फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.तसा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते बुधवारी (ता.13) मुंबई स्थित प्रदान करण्यात आले. सदर संस्थेला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून या संस्थेवर अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे.

सदर संस्था हि मागच्या अनेक वर्षांपासून सिकलसेल,एड्स, क्षय आदि रोगावर जनजागृती करित असून त्यासाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरांचे हि आयोजन करीत असते.

याखेरीज मुक्या पाळीव प्राण्यांची देखरेख व संगोपन करणे, गावात स्वच्छ्ता मोहीम राबविण्याचे कार्य अनेक वर्षांपासून करीत आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय तसेच नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून मानवसेवेत भरिव कार्य करीत आली आहे.

मानव सेवा चेरिटेबल संस्थेला राज्य शासनाने फुले शाहू आंबेडकर हा मानाचा पुरस्कार प्रदान करून संस्थेच्या कार्याला गौरविले आहे. सदर संस्थेला पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संचालक संदीप बानेवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जि.प.समाजकल्याण सभापती पूजा सेठ,पूर्व पं. स.सदस्य अखिलेश शेठ, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र रामटेके, योगेश सोनुले, पूर्व सरपंच शिवलाल नेवारे,पूर्व तंटा मुक्त स.अध्यक्ष जीवनप्रसाद दमाहे, सरपंच योगेश पटले उपसरपंच शैलेन्द्र डोंगरे,ग्रा.पं.सदस्य कीर्ती भेलावे, रीना किरणापुरे, सुषमा पटले, मालती पटले, मालती ठाकरे, सुरेंद्र पारधी, ओमकार पारधी,शरद लांजेवार यांनी अभिनंदन केले आहे.

Related posts