गोंदिया-(ता.6) बुधिस्ट समाजातील आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या समाज बांधवांसाठी बौद्ध सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सदर विवाह सोहळा शुक्रवारी (ता.8)सायंकाळी मरारटोली येथील एम.एम.टी.पटांगणावर (बायपास रोड) आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून आ.विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी प्रजित नायर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे,सहाय्यक धर्मदाय आयुक्त डॉ.दिशा पजई, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील घोंगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, तहसीलदार समशेर पठाण, नगर परिषदेचे पूर्व मुख्याधिकारी करण चव्हाण, शिक्षणाधिकारी कादर शेख, पूर्व नगराध्यक्ष कशिश जयस्वाल, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले,डॉ. पुष्पराज गिरी, डॉ. प्रशांत मेश्राम, डॉ.घनश्याम तुरकर, डॉ. सोनाली राजेंद्र वैद्य, कार्यकारी अभियंता एन. एस. भालाधरे, मधु बनसोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भाऊराव ऊके, पूर्व नगर परिषद सदस्य बंटी पंचबुद्धे, विनीत सहारे, दीपक बोबडे, विजय रगडे, पुर्व प्रशासनिक अधिकारी ए.बी.बोरकर, एड.सचिन बोरकर, मुस्लिम मायनारटीज ट्रस्ट चे अध्यक्ष सय्यद असलम अली प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
विवाह सोहळ्यात एकूण वीस जोडपी विवाहबद्ध होणार असून वर-वधूंना समितीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
सदर विवाह सोहळ्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध सामूहिक विवाह सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.