पालांदूर आणि आंधळगाव येथे प्रत्येकी ५७ लाख रुपये खर्चून ‘ग्राम सचिवालय’ बांधण्यात येणार..

180 Views

 

माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे प्रयत्न, राज्य शासनाने दिली मंजूरी..

भंडारा(15फेब्रूवारी).
जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आंधळगाव आणि लाखनी तालुक्यातील पालांदूर या गावातील ग्रामसचिवालयाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या जनसंपर्क अभियानात ही मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिली, जी पूर्ण करण्याचे आश्वासन श्री.फुके यांनी दिले.

माजी पालकमंत्री श्री.फुके हे भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम व ग्रामसचिवालयाच्या बांधकामासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचे फलित म्हणजे शासनस्तरावर झालेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत आज राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव व पालांदूर येथे दोन ग्रामसचिवालयाच्या बांधकामास मंजुरी दिली.

शासन स्तरावर या ग्रामसचिवालयाला शासनाच्या नमो 11 सूत्री कार्यक्रमांतर्गत ग्राम सचिवालय अभियानांतर्गत मान्यता देण्यात आली आहे. फुके म्हणाले, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची सरकारे ग्रामविकासावर काम करत आहेत. गावकऱ्यांच्या प्रगतीबरोबरच प्रत्येक गाव उजळून निघावे आणि विकसित व्हावे, यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे.

Related posts