माजी पालकमंत्री डॉ.फुके यांचे प्रयत्न.. जिल्ह्यातील कृषी पंपधारकांना मोठी दिलासा, आता 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा

1,228 Views

 

गोंदिया. (०३ जानेवारी)
राज्याचे माजी मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यात ग्रामीण भागातील शेतकरी संघटनांनी श्री.फुके यांची भेट घेऊन गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाच्या उत्पादनाबाबत चर्चा केली व कृषिपंप धारक शेतकऱ्यांना यापासून आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती.

या प्रकरणाची दखल घेत माजी पालकमंत्री डॉ.फुके यांनी राज्याच्या ऊर्जा व उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करून आज 3 फेब्रुवारी रोजी राज्याच्या शेवटच्या टोकावरील नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्याच्या धर्तीवर, कृषी पंपासाठी 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी केली.

या प्रकरणाची तातडीने दखल घेत प्रधान सचिवांनी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी दिलासा देऊन 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा करण्याच्या सूचना तात्काळ सम्बंधित विभागाना दिल्याने शेतकऱ्यांना मोठी दिलासा मिळाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे कृषी पंपांना 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.

Related posts