तिरोडा तालुका रा.काँ.पा. तालुकाध्यक्ष पदी कैलाश पटले यांची नियुक्ती

158 Views

 

तिरोडा। आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खा. प्रफुल पटेल यांच्या आदेशाने तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी कैलाश पटले यांची नियुक्ती करण्यात आली.

आज खासदार प्रफुल पटेल यांचे कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. श्री जैन यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांना तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बांधणी व पक्ष मजबुतीकरिता कार्य करावे तसेच पुढील वाटचालीच्या शूभेच्छा दिल्या. तिरोडा तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी कैलाश पटले यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, सोनूभाऊ पारधी, नाशिर घाणीवाला, राजेश तुरकर, वीरेंद्र इळपाते, ओम प्रकाश अंबुले, तरुण कनोजे, वासुदेव वैद्य, भूमेश्वर शेंडे, राजेश तायवाडे, असीन पठाण, आशिष चौधरी, होमेंद्र चौधरी, सुरेंद्र लिंल्हारे, ताराचंद नखाते, अशोक पटले सहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts