तिरोड़ा: माजी पालकमंत्री डॉ.फुके यांनी घेतली ठाणेगावात दिलीप बनसोड कुटुंबीयांची सांत्वना भेंट, दुःखात झाले सहभागी…

626 Views

 

तिरोडा: नुकतेच 28 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष तथा तिरोडाचे माजी आमदार दिलीपभाऊ बनसोड यांच्या वडिलांच्या शोकात सामील होण्यासाठी आज भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी ठाणेगाव येथील बनसोड कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वना भेट घेतली.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड यांचे वडील श्री वामनरावजी बनसोड यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी ठाणेगाव येथे दुःखद निधन झाले होते.

या दु:खद घटनेचे वृत्त समजताच माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी बनसोड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन आज दि.30 डिसेंबर रोजी दिलीपभाऊ बनसोड यांच्या ठाणेगाव येथील निवासस्थानी शोक संवेदना व्यक्त केली. श्री वामनरावजी बनसोड यांच्या तैलचित्रावर पुष्प अर्पण करून दिवंगत आत्म्याला आपल्या चरणी स्थान द्यावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

या सांत्वन सभेदरम्यान इंजीनियर देवेंद्र तिवारी, सुनील केलंका, ओम कटरे, जिप सदस्य माधुरीताई रहांगडाले, भाऊराव कठाने,भाऊराव जी बंसोड़, सरपंच ठाणेगाँव आई टी पटले, विक्की जगने, शीतल तिवड़े, खोब्रागडे सर, मेश्राम सर, बंसोड़ सर, महेंद्र सूर्यवंशी, शुभम बंसोड़, रेवाशंकर पटले, विशाल बंसोड़, अविनाश मेश्राम, स्वप्निल बंसोड़, सत्यशील बंसोड़ आणि बंसोड़ कुटुंबीयांच्या लोकजन उपस्थित होते.

Related posts