GONDIA: सुर्याटोला येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी महोत्सव ३० व ३१ डिसेंबर रोजी..

113 Views

 

प्रतिनिधि। 28 डिसेंबर
गोंदिया : संत गाडगे तथा तुकडोजी महाराज विश्वस्त मंडळ गाडगेनगर सुर्याटोला येथे संत गाडगे महाराज ६७ वा पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन ३० व ३१ डिसेंबर रोजी रिण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरूवात ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता प्राणज्योत प्रज्वलन करून करण्यात येणार आहे. उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते राष्ट्रीय वारकरी किर्तनकार एम.ए.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून कुणाल बिसेन, धनलाल रहांगडाले उपस्थित राहणार आहे. सायंकाळी ७ वाजता सामुदायिक प्रार्थना व हरीपाठ आयोजित करण्यात आले आहे.

३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रभाग प्रदक्षिणा (शोभायात्रा), दुपारी १ वाजता गोपाल काला किर्तन आयोजित करण्यात आले आहे. यानंतर हभप चुन्नीलाल घोरमारे महाराज तथा मंडळीच्या वतीने दही हांडी पुजन, आरती व प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गोपालदास अग्रवाल राहणार आहेत. अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष हरीहरभाई पटेल, विठ्ठलकुमार मुदंडा, मुलचंद रहांगडाले, मुकेश चन्ने, श्रीकांत क्षत्रिय, डॉ.हरीनारायण चौरसिया, विजयसिंह बैस, केवलचंद गौतम आदिंनी केले आहे.

Related posts