भंडारा : जिल्ह्यात पुन्हा ६१३ घरकुलांना मंजुरी, गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे हेच आमचा प्रयत्न- माजी पालकमंत्री डॉ. फुके

278 Views

12 कोटीच्या निधीनंतर घरबांधणीसाठी 8 कोटी 28 लाख रु. या निधीला मिळाली शासन मान्यता…

प्रतिनिधी. 15 डिसेंबर
भंडारा. जिल्ह्यातील साकोली, भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदारसंघातील गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या घटकांना मोफत घर देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आणि यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
डॉ. फुके यांच्या मागणीवरून शासनाने भंडारा जिल्ह्यातील या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्वरीत प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भंडारा यांना दिले होते.
भंडारा जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पहिल्या टप्प्यात 914 घरे आणि दुसऱ्या टप्प्यात 613 प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली होती, त्यामध्ये शासनाने आणखी 613 घरकुलांसाठी 14 डिसेंबर 2023 रोजी घरकुले मंजूर करून त्यांच्या बांधकामासाठी 8 कोटी 28 लाख 77 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
याबाबत माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके म्हणाले की, घरकुल बांधकामाच्या पहिल्या टप्प्यासाठी भंडारा जिल्ह्याला 613 घरकुल बाँधणीसाठी 2 कोटी 7 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांचे स्वप्नातील घर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शासनाद्वारे गरजु एकूण 1527 लोकांना घरकुल मिळाली आहेत. राज्याच्या विकासासाठी राज्य सरकार प्रत्येक स्तरावर सकारात्मक काम करत आहे. या लोककल्याणकारी निर्णयाबद्दल डॉ. फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Related posts