गोंदिया: आज घडीला परिचय सम्मेलन हि काळाची गरज, घनश्याम पानतवणे

154 Views

 

गोंदिया (ता.11)आज घडीला विवाह योग्य मुला-मुलींचे लग्न जुळविताना पालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच योग्य ठिकाणी वर-वधूंचे संबंध जुळवुन येत नसल्याने अनेक वेळा विवाहयोग्य असूनही अनेक युवक युवतींना अविवाहित राहण्याची भीती निर्माण होत असते. परिचय संमेलनाच्या आयोजनातून विवाह योग्य मुला मुलींचे व त्यांच्या पालकांमध्ये घनिष्ठ परिचय होत असून त्यातून लग्न जुळविण्यास मोठी मदत होते. म्हणून आज घडीला परिचय संमेलन ही काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन बौद्ध सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष व पूर्व नगरपरिषद सदस्य घनश्याम पानतवणे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मरारटोली येथे भीमघाट स्मारक समिती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंती उत्सव समिती गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुद्धिस्ट विवाह योग्य मुला-मुलींच्या परिचय संमेलनातून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमित भालेराव, भिमघाट स्मारक समितीचे सचिव श्याम चौरे, मिलिंद गणवीर, हर्षपाल रंगारी, मधु बनसोड, शैलेश टेंभेकर, सुनील मेश्राम, अनिल डोंगरे, जितेंद्र सतीशेवक, रवी भालाधरे, प्रवीण बोरकर, अमर राऊत, आकाश टेंभुर्णीकर, कपिल नागदेवे,विजय रगडे, देवेंद्र रामटेके उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात द्विप प्रज्वलन करून बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष अमित भालेराव यांनी प्रस्तावना सादर करीत कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्त्व विषद केले.

कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विवाह योग्य युवक-युवतींनी तसेच त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवून परिचय करून घेतला. कार्यक्रमाचे संचालन श्याम चौरे यांनी तर आभार आकाश टेंभुर्णीकर यांनी मानिले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भीमघाट स्मारक समिती व जयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related posts