28 रोजी नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खा. प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ..

363 Views

 

भंडारा। येत्या 28 नोव्हेंबर २०२३ ला दुपारी १२.०० वाजता लाखांदूर जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात येत आहे. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षाच्या लागवडीकरीता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून, शेतमजूर व बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. लाखांदूर, पवनी, अर्जुनी मोर, साकोली, लाखनी,व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वरदान ठरणारे नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम साखर कारखाना परिसर, लाखांदूर येथे संपन्न होणार आहे. या प्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, श्री नानाभाऊ पंचबुद्धे, श्री सुनील फुंडे, श्री विनोद ठाकरे, श्री संजय गुजर व श्री सत्यजित गुजर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या ऊस गाळप हंगामाचे शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नॅचरल ग्रोवर्स प्रा.लि.च्या संचालक मंडळाने केले आहे.

Related posts