गोंदिया: सौंदड सरपंच हर्ष मोदी यांना ग्रामसभेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

314 Views

 

घरकुलाच्या मुद्द्याला घेऊन विरोधकांनी ग्रामसभेत केला गदारोळ, विरोधकांच्या विरोधाला, गावकऱ्यांचा विरोध, एकमताने ग्रामसभेत अनेक विषय मंजुर

सडक अर्जुनी, दि. 18 नोव्हेंबर 2023 : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील ग्रामसभा वादळी करण्याचा विरोधकांचा डाव होता. घरकुलाच्या मुद्द्याला घेऊन विरोधकांनी ग्रामसभेमध्ये गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावातील नागरिकांनी विरोधकांना कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे ग्रामसभा शांतापूर्ण संपन्न झाली. सौंदड ग्रामपंचायत च्या वतीने दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 11 ते 4 या वेळेत गुरुदेव व्यायाम मंदिर सौंदड येथे ग्रामसभेचे आयोजन मंडपात करण्यात आले होते.

ग्रामसभेचे अध्यक्ष हर्ष विनोद कुमार मोदी सरपंच सौंदड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच भाऊराव यावलकर ग्रामविकास अधिकारी जगदीश नागलवाडे तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित होते. त्यात 336 नागरिकांनी स्वाक्षरी केल्या.

यावेळी 1 ते 14 असे मुद्दे घेण्यात आले होते. यात मागील ग्रामसभेचे कार्यवृत्त वाचून कायम करणे, आर्थिक वार्षिक जमा खर्चाची मंजूरी प्रदान करणे, सन 2024 – 25 चे अंदाजपत्रक मंजरी प्रदान करणे, शासकीय परिपत्रकावर चर्चा करणे, आठवडी बाजाराचे लिलाव बाबत ग्रामसभेत चर्चा करून मंजुरी प्रदान करणे, बाल सभा, महिला ग्रामसभा, वंचित घटक ग्रामसभा अश्या सर्व सभांना ग्रामसभेत चर्चा करून मंजूर प्रदान करणे, आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत सन 2024 – 25 वर्षाचा विकास आराखडा मंजूर करण्याबाबत ग्राम पातळीवर दक्षता समिती गठीत करण्याबाबत तसेच घरकुलच्या मुद्द्यावर सुद्धा यावेळी विशेष चर्चा करण्यात आली.

विरोधकांनी मंजूर यादीवर आक्षेप घेत ग्रामसभा तहकूब करण्यासाठी खूप प्रयत्न केले यात 2 सदस्य 1 माजी सरपंच आणि 5 कार्यकर्ते यांनी ग्राम सभेत मंजुर घरकुल यादी वर आक्षेप घेत गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी विरोधकांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे सर्व मुद्दे एक मताने मंजूर करण्यात आले आहेत.

यावेळी हर्ष मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मोठ्या संख्येत नागरिक ग्राम सभेत उपस्थीत होते. 336नागरिकांनी स्वाक्षरी केले त्यातील 320 नागरिकांच्या मंजुरीने विविध विषय मंजुर करण्यात आले. विरोधकांनी ग्राम सभेत गदारोळ करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांनी त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

विशेष म्हणजे सरपंच मोदी यांनी गावकऱ्यांना विविध विषयावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र यापूर्वी असलेल्या सरपंचांनी गावकऱ्यांना बोलण्याचा अधिकार काढून घेतला होता. त्या मुळेच गावकऱ्यांनी त्यांना सत्ते बाहेर ठेवले. हुकूम शाही गिरी समाप्त झाल्याचे हे उत्तम उदाहरण या ग्राम सभेतून दिसून आले.

Related posts