प्रतिनिधि।
गोंदिया। नुकतेच एकोडी येथे महिला विकास महामंडळ गोंदिया यांच्या मार्गदर्शनात व अदाणी फाउंडेशन तिरोडा यांच्या तांत्रिक सहाय्यातेने शाखा एकोडी येथे दूध संकलन केंद्रा मुळे महिलांकरीता रोजगार निर्मिती व्हावा तसेच शेतकऱ्यांना दुधाचा योग्य भाव मिळायला हवा या उद्देशाने डेअरी सब सेक्टर अंतर्गत दूध संकलन केंद्राचे उद्घाटन गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने अश्विनी रविकुमार (बंटी) पटले जिल्हा परिषद सदस्या, संजय संगेकर वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, योगेश वैरागडे लेखाधिकारी, प्रदीप कुकडकर सहनियंत्रण अधिकारी, बिमुल पटेल प्रकल्प समन्वयक अदाणी फाउंडेशन तिरोडा, मोनिका चौधरी CMRC व्यवस्थापक अदानी फाउंडेशन तिरोडा, कुंदा डोंगरे उपजीविका सल्लागार, चित्रा जतपेले उपजीविका सल्लागार, कुंजलता भुरकुडे लायलुट सह्योगीनी, हेमलता पडोळे माविम सह्योगीनी, कार्यकारणीच्या सह्योगीनी लच्छू रिनायत, ललिता धूर्वे, वैशाली बिसेन, शितल पटले, मंगला तुरकर, ममता पटले, सहिस्ता शेख,उषा भगत, वैशाली बिसेन, सुनीता बाळणे, रायवंता बिसेन,सरोज मेश्राम व अमृता बिसेन, या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.
यावेळी गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले बोलल्या की दुग्ध व्यवसायातून आपल्या ग्रामीण भागातील महिला आर्थिक सक्षम होत आहेत तसेच त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात सुध्दा भर पडत आहे. सोबतच कुटुंबाच्या उदर निर्वाह मध्ये सुध्दा महिलांचा हातभार लागत आहे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया ,अदानी फाउंडेशन तिरोडाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी व दुग्ध संकलन केंद्राच्या महीलांनी परिश्रम घेतले.