गोंदिया: ग्राहकांनी गॅस सिलेंडर विकत घेतांनी रितसर वजन करुन घ्यावे- जिल्हाधिकारी गोतमारे

637 Views

      गोंदिया, दि.9 : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी सतीश नाईक आणि पुरवठा निरीक्षक पांडुरंग हांडे यांनी केलेल्या कारवाई दरम्यान अरविंद गॅस एजन्सी, गणेशनगर, गोंदिया यांच्याद्वारे ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या गॅस टाक्या प्रमाणभुत वजनापेक्षा कमी वजन असलेल्या आढळून आल्याने संबंधित गॅस एजन्सीविरोधात अत्यावश्यक वस्तु अधिनियम तसेच एलपीजी अधिनियम 2000 अन्वये शहर पोलीस स्टेशन गोंदिया येथे 5 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

        गोंदिया तालुक्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, आपण गॅस टाकी विकत घेतांना रितसर वजन करुन घ्यावे. वजन काटा उपलब्ध नसल्यास किंवा वजन करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा अशाप्रकारे प्रमाणभुत वजनापेक्षा कमी वजनाच्या गॅस टाक्या आढळल्यास तहसिल कार्यालय, गोंदिया येथील दुरध्वनी क्रमांक 07182-236703 यावर संपर्क करावा, असे तहसिलदार गोंदिया यांनी कळविले आहे.

Related posts