गोंदिया: 19 लाखाचे जाहीर बक्षीस असलेले दोन माओवाद्यांच्या आत्मसमपर्ण..

762 Views

जिलाधिकारी आणि पुलिस अधीक्षक यांच्या समक्ष आत्मसर्मपण….दोन ही जहाल माओवादी पती- पत्नी 

प्रतिनिधि। 26 सेप्ट.
गोंदिया। देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पित योजना राबविली जात आहे. शासनाच्या या योजनाच्या ओचित्य साधून 19 लाखाचे बक्षीस असलेले दोन जहाल माओवादी ने आत्मसमपर्ण केलेले आहे.
जिलाधिकारी गोंदिया चिन्मय गोतमारे, पुलिस अधीक्षक निखिल पिंगळे अपर पुलिस अधीक्षक, अशोक बनकर,, यांचे समक्ष
1) देवरी दलम कमांडर नामे – लच्छु ऊर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी वय 39 वर्षे,
2) देवरी दलम सदस्य कमला ऊर्फ गौरी ऊर्फ मेहत्री सामसाय हलामी वय 36 वर्ष यांनी दिनांक 22/09/2023 रोजी माओवाद्यांच्या विलय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित माओवादी देवरी दलम कमांडर-1) लच्छू ऊर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारु कुमेटी याचेवर एकूण 16 लखाचे बक्षीस जाहीर असून 2) देवरी दलम सदस्य कमला ऊर्फ गौरी ऊर्फ मेहत्री सामसांय हलामी हिचेवर 3 लाख रुपये बक्षीस आहे.
आत्मसमर्पित माओवादी बाबत संक्षिप्त विवरण:
1) देवरी दलम कमांडर लच्छु उर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी हा सन 1999 पासून माओवादी संघटनेमध्ये भरती झाला त्यांनतर त्याने अबुझमाड मध्ये प्रशिक्षण घेवून स्पेशल झोनल कमेटी मेंबर शेखर ऊर्फ सायण्णा याचे अंगरक्षक म्हणून काम केले.  तसेच केशकाल दलम, कोंडगाव दलम (छट्टीसगड.), कोरची, खोब्रामेंढा (गडचिरोली) तसेच गोंदिया येथील देवरी दलम (महाराष्ट्र) मध्ये उप कमांडर या पदावर काम केले आहे. त्याने नक्षल दलममध्ये केलेले काम पाहून त्यास देवरी दलमकचे कमांडर पद देण्यात आले होते. त्याचेविरुद्ध गोंदिया जिल्हयात चकमकीचे व जाळपोळीचे एकूण 6 गुन्हे नोंद आहेत.
2) देवरी दल सदस्य नामे – कमला ऊर्फ गौरी ऊर्फ मेहत्री सामसाय हलामी ही सन 2001 मध्ये खोब्रामेंढा दलम मध्ये भरती झाली असून त्यानंतर तिला उत्तर बस्तर व बालाघाट (म. प्रदेश) च्या जंगलात पाठवून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने दलम सदस्य म्हणून  कोरची, खोब्रामेंढा, चारभट्टी दलम, प्लाटून- ए (गडचिरोली), गोंदिया येथील देवरी दलम मध्ये काम केले आहे.  तिचेविरुद्ध गोंदिया जिल्हयात मारहाण, पोलीस पार्टीवर फायरिंग, जाळपोळ असे एकूण 8 गुन्हे नोंद आहेत.

 दोन्ही पती-पत्नी यांनी आत्मसमर्पीत होण्याची महत्वाची कारणे..

1) नक्षल संघटनेचे/चळवळीचे नेमके ध्येयधोरण खालील कॅडर ला कळत नाही. भविष्य अंधकारमय वाटतो.
2) माओवादी संघटनेतील वरिष्ठ कॅडर हे नक्षल चळवळीकरीता पैसे/फंड गोळा करण्याबाबत सांगतात. परंतु प्रत्यक्षात सदर पैसा हे स्वतःसाठीच वापरतात.
3) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा माओवाद्यांना पाहिजे तसा पाठींबा मिळत नाही.
4) माओवादी नेते हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करुन घेतात.
5) दलम मध्ये असतांना विवाह झाले तरी वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
6) परीवारातील सदस्यांना, नातेवाईकांना कोणतिही अडचण असली तरीही मदत करता येत नाही.
7) दलममध्ये असतांना वेळेवर जेवण वगैरे मिळत नाही. तेथील जिवन फार खडतर असते. आरोग्याविषयीं समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही.
8) पोलीस दलाच्या सततच्या नक्षल विरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे. पोलिसांची सारखी भीती वाटते.
9) वरिष्ठ कॅडर हे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन निरपराध आदिवासी बांधव/ सामान्य नागरीकांना ठार मारायला सांगतात.
10) महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावित होऊन समर्पण करण्याचा निर्णय घेतला.
 त्याचप्रमाणे आत्मसमर्पीत होण्याचे प्रमुख कारण :
कमला हिची तब्येत बिघडल्याने उपचाराकरीता सुरत येथे पाठविण्यात आले. सुरत येथून परत आल्यानंतर देखील तिची प्रकृती बरी राहत नव्हती. तिला दलम सोडुन जाण्याचा सारखा विचार येत होता. त्यामुळे ती तिचा पती लच्छु याला देखील दलम सोडण्याबाबत वेळोवेळी बोलत असे. शेवटी दोघांनिही दलम सोडण्याचा निर्णय घेतला. दलम सोडल्यानंतर त्यांना पुन्हा नक्षल चळवळीत जायचे नव्हते. त्यामुळे ते आत्मसमर्पण करण्याच्या सतत संपर्कात होते. परंतु त्यांना मदत मिळाली नाही. त्यानंतर ते गोंदिया जिल्हा पोलीसांचे संपर्कात आले व गोंदिया जिल्हा पोलीसांसमक्ष आत्मसमर्पण केले असल्याचे सांगितले.
आत्मसमर्पण केल्यानंतर लच्छू उर्फ लक्ष्मण उर्फ सुखराम कुमेटी यास देय बक्षीस :
महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत पदनिहाय जाहिर बक्षीस- 3 लाख रूपये व केंद्र शासनाच्या एस.आर.ई. योजने अंतर्गत अडीच लाख रुपये असे एकुण 5 लाख 50 हजार  रुपये तर कमला उर्फ गौरी हिस 4 लाख 50 हजार रुपये. तसेच दोन्ही पती-पत्नी एकत्रित आत्मा समर्पण केल्यामुळे अतिरिक्त एक लाख पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,गोंदिया चिन्मय गोतमारे यांनी तसेच पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, अशोक बनकर, यांनी  माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ठ होवून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेवुन आपले जीवन सुकर करण्याचे आवाहन केले आहे.

Related posts