571 Views लाखांदुर दौऱ्यात विद्यार्थ्यांनी बसेस न थांबवण्याची सांगितली होती व्यथा.. भंडारा. ऑगस्ट 01 31 जुलै रोजी लाखांदूर तहसीलच्या दहेगाव येथे नियोजित दौऱ्यात अनेक शालेय विद्यार्थ्यांनी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी लाखांदूर-वडसा मार्गावर राज्य परिवहन विभागाच्या सामान्य बस आणि सुपर बसेसना थांबा न देणे आणि नियमित थांबे नसणे याबाबत डॉ. फुके यांनी व्यथा सुनावली. या भेटित विद्यार्थ्यांनी माजी पालकमंत्री डॉ.फुके यांना सांगितले की, लाखांदूर-वडसा रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित व जलद गति बसेससाठी स्टापेज नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाण्यास विलंब होतो. सुपर बसला चपराड, सोनी, सावंगी…
Read MoreCategory: मराठी बातम्या
हेलमेट सक्ती नियमांचे काटेकोर अंमलबजावणी सुरू, सालेकसा मुख्य चौकात पोलिस पेट्रोलिंग सुरू..
696 Views प्रतिनिधी / सालेकसा महाराष्ट्र शासनाने हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. यासाठी विविध ठिकाणी जनजागृती करिता मोहीम सुद्धा राबवण्यात आली आहे. शाळा महाविद्यालयातर्फे प्रभात फेरी काढून हेल्मेट वापरण्याबाबतची संदेश सुद्धा नागरिकांना दिले आहेत. तरीही नागरिकांकडून हेल्मेट वापरणे टाळले जात असल्याने आता पोलीस विभागातर्फे पेट्रोलिंग करून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाहीचे पवित्र घेतलेला आहे. सालेकसा येथील मुख्य चौकात वाहतूक विभाग गोंदिया तसेच सालेकसा पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने पोलीस पेट्रोलिंग करून हेल्मेट सक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून आर्थिक दंड वसूल करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, वाहतूक…
Read Moreमुंबई: राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे वित्त व नियोजन
794 Views मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त…
Read Moreसमृद्धि महामार्ग अपघात: नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळ कोपला..
957 Views वर्धा : बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या…
Read Moreसमृद्धि महामार्ग अपघात: मृतांची ओळख पटविण्यात अडचण, सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय..
676 Views बुलढाणा: समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्यात खाजगी ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात 26 प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला. यात वर्ध्यातील 14 लोकांचा समावेश होता. या सर्वांवर रविवारी बुलढाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात भाजले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलढाण्यात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाणा येथे गेलेले वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशांचे नातेवाईक आधीच बुलढाणा येते…
Read More