तिरोडा शहरातील १० रस्त्यांच्या बांधकामासाठी १.९ कोटीचा निधी मंजूर, खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुरावा यश..

507 Views

 

गोंदिया : शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेतंर्गत तिरोडा शहरातील रस्ता बांधकामासाठी १ कोटी ९ लाख ६४ हजार ४५० रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. सदर प्रस्तावित कामांच्या निधीबाबत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा.प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान खा. प्रफुल पटेल यांनी मंत्रालयाशी पाठपुरावा केला. यामुळे पाठपुराव्याला यश आले असून तिरोडा शहराच्या विकासकामांना अधिक गती येणार आहे.

तिरोडा शहराच्या विकासासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा.प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी मंत्रालय व मंत्र्याशी पाठपुरावा करून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. यानुरूप राज्याच्या नगर विकास विभागाने विशेष रस्ता अनुदान कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

तिरोडा शहरातील १० रस्त्यांच्या बांधकामासाठी १ कोटी ९ लाख ६४ हजार ४५० रूपयाचा निधीला मंजूरी देण्यात आली आहे. या निधीतून तिरोडा येथील प्रभाग क्र.१ येथे ९ लाख ९ हजार ७०० रूपये निधीतून सिमेंट रस्ता व क्रॉकीट नाली कवर बांधकाम, प्रभाग क्र.१ मध्ये ९ लाख ९ हजार ६०० रूपये निधीतून सिमेंट रस्ता, प्रभाग क्र.१ मध्ये ९ लाख ९९ हजार ८५० रूपये निधीतून सिमेंट क्रॉकिट रस्ता, प्रभाग क्र.५ मध्ये ९ लाख ९७ हजार १०० रूपये निधीतून सिमेंट क्रॉकिट रस्ता, प्रभाग क्र.५ मध्ये १९ लाख ९८ हजार ५०० रूपये निधीतून रस्ता खडीकरण व डांबरीकरण, प्रभाग क्र.७ येथे ९ लाख ९८ हजार ९०० रूपये निधीतून रस्ता खडीकरण, शहरात ९ लाख ९७ हजार ४०० रूपये निधीतून सिमेंट क्रॉकिट रस्ता बांधकाम, प्रभाग क्र.६ येथे ९ लाख ९४ हजार ९०० रूपये सिमेंट नालीसह कवर ओटे बांधकाम, प्रभाग क्र.६ मध्ये ९ लाख ७९ हजार २०० रूपये निधीतून सिमेंट क्रॉकिट रस्ता बांधकाम व प्रभाग क्र.३ मध्ये ९ लाख ९९ हजार ३०० रूपये निधीतून सिमेंट क्रॉकिट रस्ता बांधकामाचा समावेश आहे.

या विकासकामांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती मिळणार, असा आशावाद माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला. तर निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल खा.प्रफुल पटेल यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

Related posts