गोंदिया: आरटीओने शासनाला मिळवून दिला उच्चांकी 54 कोटींचा महसूल..

346 Views

 

गोंदिया: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये उच्चांकी 54 कोटी 74 लक्ष इतका शासकीय महसूल महाराष्ट्र शासनाला मिळवून दिला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 9 कोटींचा जास्तीचा महसूल प्राप्त झालेला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी नियोजन केले होते. या कामगिरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

यामध्ये प्रामुख्याने वाहनावरील कर, विविध सेवांकरिता शुल्क तसेच दंडवसुली इत्यादींचा समावेश आहे. यावर्षी कार्यालयामार्फत 14083 दुचाकी, 1704 चारचाकी व इतर 2118 अशा एकूण 17905 इतक्या वाहनांची नोंदणी करण्यात आलेली आहे. कार्यालयाच्या वायुवेग पथकाने 3005 वाहनांवर कारवाई करुन 01 कोटी 28 लक्ष इतकी दंडवसुली केलेली आहे, तर सीमा तपासणी नाका देवरी येथून 7 कोटी 99 लक्ष इतका महसूल प्राप्त झालेला आहे.

गोंदिया जिल्हा नक्षलप्रभावित, आदिवासी बहुल तसेच मागासलेला असूनही उप प्रादेशिक परिवहन गोंदिया कार्यालयाने मोठया प्रमाणात शासनाला महसूल मिळवून दिलेला आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे.

Related posts