गोंदिया: उद्या 3 मार्च ला “श्रद्धेय अटलजींचे महानाट्य”; 200 हून अधिक कलाकार साकारणार महानाट्य..
गोंदिया : 200 हून अधिक कलाकार… भव्य असा रंगमंच आणि त्यावर उलगडला जाणारा भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनपट. हे सगळं अनुभवण्याची संधी गोंदियाकरांना चालून आली आहे, ती 3 मार्च रोजी. खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून राष्ट्रपुरुष अटल या महानाट्याचे आयोजन गोंदिया येथे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारा या महानाट्याच्या माध्यमातून माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनपट लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न होत आहे. खासदार सुनील मेंढे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
सामान्य कार्यकर्ता ते देशाचे पंतप्रधान असा अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रवास या महानाट्यातून उजागर होणार आहे. गोंदिया येथील पोवार बोर्डिंग येथे हे आयोजन करण्यात आले असून भव्य अशा रंगमंचावर 150 ते 200 कलाकार या महानाट्याला मूर्त रूप देणार आहे.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता महानाट्याचा श्री गणेशा होणार आहे. नागरिकांनी अटलजी अनुभवण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन खा..सुनील मेंढे यांनी केले आहे.