गोंदिया: महाशिवरात्री निमित्त जिल्हाभरात आयोजित सर्व यात्रा रद्द, प्रतापगड यात्रा रद्द, ख्वाजा उस्मान गनी हारुनी उर्स रद्द

1,157 Views

 

जिलाधिकारी नयना गुंडे ने निगर्मित केले सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश..

गोंदिया – सद्यास्थितीत जिल्हयात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने रुग्णांची संख्या कमी दिसुन येत असली तरी सुध्दा मौजा प्रतापगड तसेच गोंदिया जिल्हयातील इतर धार्मिक व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी दिनांक 01 मार्च 2022 रोजी महाशिवरात्री निमित्त यात्रा भरल्यास कोरोना विषाणुच्या प्रदुर्भाव होऊन कोविड-19 या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब लक्षात घेता महाशिवरात्री निमित्त गोंदिया जिल्ह्यात आयोजित सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी निर्गमित केले आहेत.


कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना “ सक्षम प्राधिकारी ” घोषित केलेले आहे. या अधिकारात यात्रा रद्द आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
महाशिवरात्री निमित्त जिल्हयातील धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ या ठिकाणी तसेच प्रामुख्याने तालुका अर्जुनी मोरगाव अंतर्गत मौजा प्रतापगड येथे सलग 5 दिवस महाशिवरात्री व ख्वाजा उस्मान गनी हारुनी उर्स करीता यात्रा भरत असते. सदर यात्रेमध्ये दरवर्षी यात्रा कालावधीत बाहेर जिल्हा व राज्यातुन तसेच या जिल्हयातुन दररोज हजारोच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दीचे स्वरुप हे मोठया प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सद्यास्थितीत जिल्हयात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने रुग्णांची संख्या कमी दिसुन येत असली तरी सुध्दा मौजा प्रतापगड तसेच गोंदिया जिल्हयातील इतर धार्मिक व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी 01 मार्च 2022 रोजी महाशिवरात्री निमित्त यात्रा भरल्यास कोरोना विषाणुच्या प्रदुर्भाव होऊन कोविड-19 या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जिल्हयात सदर यात्रेचे आयोजन केल्यास कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्व सामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरु सकते. त्याअनुषंगाने सदरची यात्रा भरविणे उचित होणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये गोंदिया जिल्हयातील तालुका अर्जुनी मोरगाव अंतर्गत मौजा प्रतापगड तसेच गोंदिया जिल्हयातील इतर सर्व ठिकाणी जिथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरत असतात त्या सर्व यात्रा रद्द करण्याचे याव्दारे आदेशीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सदर आदेशाचे पालन न करणारी अथवा उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भरतीय दंड संहिता 1860 नुसार अपराध केला असे मानन्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related posts